आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापूर:विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेणार; ग्रीष्मकालीन खेळ, क्रीडा प्रशिक्षण शिबिर

दर्यापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनमुळे विद्यार्थी मैदानापासून दूर गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास काहीसा खुंटला. त्यातून बाहेर पडण्यासाठी ग्रीष्मकालीन खेळ व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रबोधन विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय रेवस्कर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १५ ते ३० एप्रिलदरम्यान आयोजित या शिबिरात अनेक खेळ व क्रीडा प्रकार शिकवले जातील. पत्रकार परिषदेला नरेंद्र गोंडाणे, गजानन सरदार, लता श्रीनाथ, शोभा भिसे, प्रतीभा संत, निखिल बुंदेले, लालसिंग राठोड, जितेश रापर्तीवार, हरीश माहुरे, क्रांती गहरवाल, विजय इंगळे, रामराजा जऊळकार आदी उपस्थित होते.

१५ दिवस चालणाऱ्या शिबिरामध्ये कबड्डी, धनुर्विद्या, कराटे, बॅडमिंटन, तायकांदो, रोप मल्लखांब, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक, एरोबिक, स्किपिंग, नृत्य, चित्रकला, योगा प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिबिराची चोख व्यवस्था व यशस्वीतेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्याची माहितीही मुख्याध्यापकांनी दिली. दरम्यानस शिबिरात सहभागी होण्यासाठी निखिल बुंदेले- ९०२८६७२९८७, जितेश रापर्तीवार- ९८८११९४२५८, हरीश माहुरे- ७४२०८५४७७७, क्रांती गहरवाल- ९०२८६६२६५० यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत, असे आवाहनही करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...