आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:थंडीसोबत नव्या, रसाळ फळांचेही आगमन

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात आरोग्यदायी अमरफळ, ड्रॅगन फ्रूट, किवी या फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत असून, त्यांचे शहरवासीयांना आकर्षण वाटत आहे. यासोबतच गावरानी पेरू, संत्री, मोसंबी, सीताफळे, आवळे, सफरचंद, चिकू अशी फळे उपलब्ध असल्यामुळे तसेच त्यांचे दरही आवाक्यात असल्याने त्यांचा आहारात समावेश करण्यात आला आहे.

कधी थंडीचे आगमन होते कधी नव्या फळांचा हंगाम सुरू होतो, याचीच फळांची आवड असलेले आतुरतेने वाट बघत असतात. साधारणत: दिवाळीपासून या फळांची आवक सुरू झाली आहे. आवळे, काळे शिंगाडे ही फळेही सध्या आवडीने खाल्ली जात आहेत. केळी, सफरचंद हे फळ १२ ही महिने मिळते. त्यामुळे या कालावधीत या फळांकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही. परंतु, नवीन फळे जसे अमरफळ, ड्रॅगनफ्रूट, किवी, गोड चिंच अशा नव्या फळांची एकदा तरी चव आम्ही चाखतोच. कारण ही फळेही शरीराला तजेला देण्यासोबतच आरोग्यदायी आहेत.

किंमत कमी-जास्त असली तरी आपल्याला हवे तेवढे खरेदी करतो, अशी माहिती फळांची आवड असलेले खवय्ये मोहन आंबुलकर यांनी दिली. अमरफळ, ड्रॅगन फ्रूट, किवी ही तिन्ही फळे मुंबई येथील बाजारातून शहरात येत आहेत. थोड्या प्रमाणात रसबेरीचाही समावेश आहे. रसबेरी हे बाहेरून पातळ वाळलेल्या पानासारखे आवरण व आत शेंदरी रंगाचे लहान टोमॅटोसारखा दिसणारे फळ आहे. परंतु, त्याचा सुगंध व चव ही अप्रतिम असते. याच कालावधीत स्ट्राॅबेरीचीही आवक होत आहे. परंतु, स्ट्रॉबेरी सुगंधित असली तरी गोडवा कमी असल्यामुळे ग्राहक मर्यादित प्रमाणातच खरेदी करीत आहेत. यासोबतच हिवाळी खरबूज, टरबूजही बाजारात दिसत आहेत. परंतु, त्यांना विशेष मागणी नाही. मोसमातील फळांची चव चाखण्यास प्राधान्य दिले जात आहे.

दर्जानुसार फळांचे दर
हिवाळा सुरू झाल्यामुळे सध्या बाजारात फळांची आवक वाढली आहे. मात्र, दर्जानुसार फळांचे दर निश्चित होत आहेत. अगदी ताजे व देखणे फळ ज्याला आम्ही ‘गोल्डन’ म्हणतो त्याचे दर हे त्याच प्रजातीच्या फळांपेक्षा ५० रुपयाने जास्त असतात. -राहुल मोटवानी, फळांचे विक्रेते, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...