आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • With The Consent Of The Ministers Along With The Environmentalists, The Big Trees Will Get Life, The Decision In The Meeting Of The Environment Ministers

वृक्षांना जीवनदान:पर्यावरणप्रेमींसह मंत्र्यांच्या सहमतीने मोठ्या वृक्षांना मिळणार जीवनदान, पर्यावरणमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आम्हाला आमच्या शहरातील वृक्ष वाचवायचे आहेत. हिंसक नको तर अहिंसेच्या मार्गाने वृक्षतोड थांबवायची आहे, अशा प्रकारची हाक दिली जात आहे. पर्यावरणप्रेमींसह मंत्र्यांच्या सहमतीने मोठ्या वृक्षांना जीवनदान मिळणार अाहे, असा निर्णय पर्यावरण मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.

सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यानची वृक्षतोड तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. सेवाग्राम मार्गावरील वृक्ष कसे वाचवता येतील, याबाबत वृक्ष बचाओ समिती स्थापन केली असून, समितीचे तसेच शासनाचे तज्ज्ञ सल्लागार नव्याने रस्ता आणि वृक्ष यांची पुनर्मोजणी करीत आहेत. याबाबत सलग तीन दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत समितीच्या सदस्यांनी बैठका घेऊन पर्याय शोधणे सुरू केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील गांधी पुतळा ते सेवाग्राम आश्रम या मार्गाला ‘शांती पथ’ बनवत पूर्वीप्रमाणेच हिरवेगार ठेवत एकही झाड न तोडता होणाऱ्या रस्त्याच्या विकास कामाला आमचा विरोध नाही, अशी भूमिका वृक्ष बचाओ समितीने घेतली आहे. या मार्गाचे अनावश्यक रुंदीकरण न करता आहे त्याच रस्त्याला पर्यावरणपूरक करीत ‘शांती पथ’ निर्माण केल्यास तो देशासाठी माॅडेल ठरेल, अशी भूमिकाही या वेळी मांडण्यात आली. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी समिती पुन्हा पत्रव्यवहार करणार असून, शासन, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या समन्वयातूनच हा प्रश्न मार्गी लावावा, असा सूर समितीतील सामाजिक व पर्यावरणप्रेमी संघटनांनी लावला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके यांच्यासोबत झालेल्या या दैनंदिन बैठकांना शासनाचे वृक्ष सल्लागार श्रीकांत देशपांडे, समिती सदस्य डाॅ. विभा गुप्ता, मुरलीधर बेलखोडे, सुषमा शर्मा, संजय इंगळे तिगावकर, डाॅ. सचिन पावडे, सुनील फरसोले, डाॅ. आलोक बंग, ओजस सु.वि., डाॅ. विठ्ठल साळवे, अद्वैत देशपांडे, सूचि सिन्हा, निरंजना मारू, श्याम भेंडे, करुणा फुटाणे, डाॅ. सुमेध जाजू, डाॅ. अनुपमा गुप्ता, डाॅ. दिलीप गुप्ता, वसंत फुटाणे, अक्षद सोमनाथे, मनोज ठाकरे आदींची उपस्थिती होती.

वृक्षतोड न करता रस्ता बांधणे हे मंत्री ठरवणार
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वर्धा ते सेवाग्राम मार्गावरील वृक्षतोड सुरू आहे. ती थांबवण्यासाठी पर्यावरणप्रेमी लढा देत आहेत. दोन पर्याय निवडले आहेत. दुतर्फा भागातील वृक्षतोड न करता रस्ता बनवण्यात यावा, किंवा एकाच भागातील वृक्ष तोडून चारपदरी रस्ता तयार करण्यात यावा, असा निकष बैठकीत ठरवण्यात आला आहे.पुढील निर्णय मंत्री घेतील. - श्रीकांत देशपांडे, शासनाचे वृक्ष सल्लागार, नागपूर

बातम्या आणखी आहेत...