आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:वरुड मार्गावरील वाळलेल्या झाडाने घेतला महिलेचा बळी; सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध नागरिकांचा संताप

शिरखेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-वरुड रस्त्यावर अनेक ठिकाणी वाळलेली झाडे आहेत. ही झाडे वेळी-अवेळी तुटून पडतात. त्यामुळे अपघात होऊन प्रसंगी नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला. सोमवारी वाळलेले झाड अंगावर पडल्याने अमरावतीच्या आकोली परिसरातील वर्षा महल्ले यांचा बळी गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला, असा नागरिकांचा आरोप आहे.

ही महिला दुचाकी वाहनाने प्रवास करीत होती. पतीच्या निधनानंतर दोन मुलींची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. परंतु या अपघाताने सारे काही होत्याचे नव्हते केले असून, दोन्ही मुलींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या संकटाला जबाबदार कोण, असा नागरिकांचा प्रश्न असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती जणांचा बळी गेल्यावर रस्त्याच्या कडेला उभी असलेली अशी शुष्क झाडे तोडतील, असा मुद्दा पुढे आला आहे.

अमरावती-वरुड-पांढुर्णा महामार्गाचे काम होऊन दोन वर्षे झाली. या महामार्गाच्या दोन्ही बाजूने ३० ते ४० फूट उंचीची पूर्णपणे वाळलेली व जीर्ण झालेली बरीच झाडे आहेत. या झाडांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. आधीच सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली असती तर त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला नसता या महिलेच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी नेरपिंगळाई येथील भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष इकबाल हुसेन फिदा हुसेन यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...