आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसीबीच्या जाळ्यात:शिरजगाव बंडच्या महिला सरपंच पतीसह लाचप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या विविध कामांचे बिल मंजूर करण्यासाठी शिरजगाव बंडच्या सरपंच व सरपंचाच्या पतीने ३० हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार ‘एसीबी’कडे केली होती. या प्रकरणी ‘एसीबी’ने गुरुवारी (दि. ८) सरपंच महिलेच्या पतीला कंत्राटदाराकडून लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. तसेच सरपंच महिलेला सुद्धा ताब्यात घेतले आहे. ही कारवाई चांदूर बाजार लगतच्या एका धाब्यावर झाली आहे.

शिल्पा धीरज इंगळे (३९) आणि धीरज रामरावजी इंगळे (४३, दोघेही रा. शिरजगाव बंड ता. चांदूर बाजार) असे ‘एसीबी’ने ताब्यात घेतलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. शिरजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये केलेल्या विविध कामांचे देयक काढण्यासाठी सरपंच व त्यांच्या पतीने ३० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार कंत्राटदाराने १८ नोव्हेंबर २०२२ ला एसीबीकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने २० नोव्हेंबर व नंतर ७ डिसेंबरला पडताळणी केली. त्यावेळी सरपंच शिल्पा इंगळे व पती धीरज इंगळे यांनी ३० हजार रुपयांची मागणी करुन ती रक्कम स्विकारण्याबाबत तयारी दर्शवली होती. त्यामुळेच गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास एसीबीच्या पथकाने अचलपूर ते चांदूर बाजार मार्गावरील अंकुश

बातम्या आणखी आहेत...