आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदैवाने:गारगोटी नाल्याच्या पुरात वाहून गेली महिला; इतर दोघी सुदैवाने बचावल्या

धामणगाव रेल्वे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जुना धामणगाव येथील शेतमजूर महिला सोमवारी झालेल्या पावसामुळे शहापूर शेतशिवारालगतच्या गारगोटी नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली, तर वाहत्या पाण्यात दोन महिलांना नाल्यालगतचा झुडपाचा आधार मिळाल्यामुळे सुदैवाने त्या बचावल्या. ही घटना दुपारी अडीच वाजता घडली. वाहून गेलेल्या महिलेचा शोध सुरू असून वृत्त लिहिस्तोवर तिचा शोध लागला नव्हता. संगीता मनदेव नागापुरे (४०) असे वाहून गेलेल्या, तर सीमा वेलुकर व मंगला तायडे असे बचावलेल्या महिलांची नावे आहेत.

तालुक्यातील जुना धामणगाव येथील संगीता नागापुरे, सीमा वेलुकर व मंगला तायडे या तीन शेतमजूर महिला शहापूर शिवारात शेती कामासाठी गेल्या होत्या. दरम्यान त्या घरी परत येत असताना परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गारगोटी नाल्याला पूर आला. अचानकपणे नाल्याला पूर आल्याने एकमेकींचे हात धरून निघत असतानाच त्यापैकी तिघीजणी वाहून गेल्यात. गावकऱ्यांसोबतच अमरावती येथील एनडीआरएफचे पथक महिलेचा शोध घेत आहे. दरम्यान बचाव पथकातील कर्मचारी सचिन धरमकर हे बचाव कार्यादरम्यान जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...