आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:स्त्रियांनी स्वत:ला एका कोषात कोंडून न घेता आपल्यासाठी भरीव कार्य करावे

अमरावती7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. दया पांडे यांचे प्रतिपादन; तक्षशिला महाविद्यालयात महिला दिवस

स्त्रियांनी स्वत:ला एका कोषात कोंडून न घेता स्त्रियांनी स्त्रियांकरता भरीव कार्य केले पाहिजे. स्वातंत्र्याची एखादी नवीन विवेकी कल्पना स्त्रियांनी निर्माण केली पाहिजे. महिला दिवस एक दिवसापुरता मर्यादित करू नये, असे प्रतिपादन भारतीय महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दया पांडे यांनी केले. त्या तक्षशिला महाविद्यालयात आभासी पद्धतीने आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या.

श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दारापूर येथील रामकृष्ण महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण कक्षाच्या संयुक्त सहकार्याने महिला दिवसानिमित्त एक दिवसीय व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी संस्थेच्या अध्यक्ष किर्ती अर्जुन यांनी कार्यक्रमाचे उद््घाटन केले. अध्यक्षपदी संस्थेचे सचिव प्रा. पी. आर. एस. राव होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता प्रमुख डॉ. वर्षा गावंडे, प्राचार्य डॉ. पडवाल मल्लू, प्राचार्य डॉ. अंजन कुमार सहाय, प्रभारी प्राचार्य प्रा. यशवंत हरणे उपस्थित होते. लिंग भाव संवेदनशीलता, प्रभाव आणि परिणाम या विषयावर व्याख्यान झाले. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तथा बहुसंख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. ऑनलाइन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंजली वाठ, तर प्रास्ताविक प्रा. दीपाली पडोळे यांनी केले. मान्यवरांसह कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे डॉ. सारिका बोदडे यांनी आभार मानले. आभासी पद्धतीने पार पडलेल्या कार्यक्रमाचा लाभ सोनारखेडा आणि वडगाव माहुरे येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या दरम्यान ग्रामस्थ महिला तथा स्वयंसेवक, स्वयंसेवकांनी सुद्धा घेतला.

‘कार्यकर्तृत्वाने स्त्रिया गाजवताहेत प्रत्येक क्षेत्र’: कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. पी. आर. एस. राव यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. स्त्रियांनी आपले अस्तित्व वेगवेगळ्या क्षेत्रात सिद्ध केले आहे. स्त्री आजही प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीनेच कार्य करीत असल्याचे मत त्यांनी या वेळी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
आपल्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी व्हावा : कीर्ती अर्जून

आजच्या शिक्षित स्त्रियांनी उपेक्षित स्त्रियांकरता त्यांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण एकट्या आहोत, असा त्यांच्यामध्ये असलेला गैरसमज दूर करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांवर असून, आपल्या शिक्षणाचा फायदा हा समाजासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी व्हावा, असे मत या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष कीर्ती अर्जून यांनी व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...