आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खेलो इंडिया ‘दस का दम’ उपक्रमांतर्गत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाद्वारे देशातील विविध शहरांमध्ये महिलांच्या धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन केले असून, यात अमरावती शहरालाही स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. ही स्पर्धा केवळ महिलांसाठीच राहणार हे विशेष. राज्यातील धनुर्विद्या खेळाचे माहेरघर तसेच देशातील सर्वोत्तम आर्चरी रेंज येथे असल्यामुळे या स्पर्धेचे यजमानपद अमरावतीला मिळाले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठापुढील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्चरी रेंजवर ही स्पर्धा २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजतापासून आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यासह विभागातील महिला धनुर्धरांना त्यांचे कौशल्या दाखवता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे यांनी दिली. खेळांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने ‘दस का दम’ उपक्रमांतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यातून उदयोन्मुख महिला धनुर्धरही शोधल्या जाणार आहेत. महिलांमध्ये असलेल्या क्रीडा कौशल्याला उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच त्यांच्यातून आंतरराष्ट्रीय धनुर्धर मिळवण्यासाठीही या स्पर्धेचा उपयोग होणार आहे. महिला खेळाडूंना त्यांच्या किटसह उपस्थित राहायचे आहे.
जास्तीत जास्त महिला खेळाडूंचा सहभाग
ही स्पर्धा महिलांच्या सर्वच गटासाठी खुली असून या स्पर्धे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व नवोदित महिला खेळाडू सहभागी होतील. स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेकडे आहे. -प्रमोद चांदूरकर, महासचिव, भारतीय धनुर्विद्या संघटना.णार आहे. महिला खेळाडूंना त्यांच्या किटसह उपस्थित राहायचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.