आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर, खाद्य तेल आदींचे वाढते भाव बघता सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. या निषेधार्थ अमरावती शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी राजकमल चौकात केंद्र शासनाच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी केंद्र शासनाविरोधात नारेबाजी करण्यात आली.
सद्या सुरू असलेल्या महागाईमुळे प्रत्येक घरांमध्ये भाजपा विरोधात असंतोष निर्माण केलेला आहे. गृहिणींची बजेट बिघडल्यामुळे घर चालवणे कठीण झाले असल्याचे महिला काँग्रेसचे म्हणणे आहे. तसेच पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्याने वाहन धारकाचे आर्थिक बजेटही बिघडल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे महागाई विरोधात काँग्रेस पक्षाने आंदोलन पुकारले आहे. सोमवारी राजकमल चौकात इंधन दरवाढ, खाद्य तेल, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीचा निषेध नोंदवला.
यावेळी अमरावती शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. अंजली ठाकरे, शहराध्यक्ष बबलू शेखावत ,माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, राजू भेले, विनोद सुरीसे, कांचनमाला गावंडे, सुजाता झाडे, देवयानी कुर्वे, अर्चना सवाई, जयश्री वानखडे, शोभा शिंदे, योगीता गिरासे, शीतल देशमुख, अर्चना बोबडे, कांचन खोडके, शीतल देशमुख, सविता धांदे आदी उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.