आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिवस साजरा‎:जनता इंग्लिश स्कूलमध्ये‎ महिला दिवस साजरा‎

शेंदुरजनाघाट12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनता इंग्लिश‎ स्कूल येथे जागतिक महिला‎ दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात‎ आला. मान्यवरांच्या हस्ते‎ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे‎ पूजन व हारार्पण करण्यात आले.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता‎ इंग्लिश स्कूलच्या प्रभारी‎ मुख्याध्यापिका जयश्री आंडेतसेच‎ प्रमुख अतिथी म्हणून तेजस्विनी‎ गणोरकर उपस्थित होत्या. या प्रसंगी‎ विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या‎ महिलांच्या जीवनावर प्रकाश‎ टाकण्यात आला.

श्रीवेश भोगे,‎ ओवी शिंगरवाडे, भारवी फुटाणे,‎ माही टाकरखेडे या विद्यार्थ्यांनी‎ त्यांच्या भाषणातून स्त्रियांच्या‎ जीवनावर प्रकाश टाकला.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा‎ खेरडे, प्रास्ताविक मंजूषा सिंगरवाडे‎ यांनी केले. कार्यक्रमाला शाळेच्या‎ शिक्षिका ज्योती बोरकुटे, प्राजक्ता‎ काळे, कल्याणी बिडकर, तसेच‎ शिक्षकेतर कर्मचारी संध्या हिरडेकर‎ उपस्थित होत्या. राष्ट्रवंदनेने‎ कार्यक्रमाची सांगता झाली.‎

बातम्या आणखी आहेत...