आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला संतप्त:महिलांचे संसार उद्ध्वस्त होताहेत साहेब, गावात दारु बंदी करा ; कारवाईचे आश्वासन

अंढेरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून अंत्री खेडेकर येथे अवैध दारु विक्रीचा महापूर आला आहे. दिवस-रात्र गावात दारूची अवैध विक्री होत असून त्यामुळे गावातील महिला संतप्त झाल्या आहेत. अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होताहेत साहेब, गावात दारु बंदी करा, अशी मागणी करत महिलांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली. दारूबंदीसाठी संतप्त झालेल्या महिलांचे रौद्र रुप पाहून ठाणेदार हिवरकर यांनी ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

येथील पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या अनेक गावांत अवैध धंद्याचे स्तोम माजले आहे. या गावात दिवस रात्र अवैध दारू विक्री होत आहे. परंतु या अवैध धंद्याकडे पोलिसांचे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी बायगाव खुर्द येथील महिलांनी गावातील अवैध दारू विक्रीला कंटाळून पोलिस स्टेशन गाठून निवेदन दिले होते.

दारुड्याने पत्नीचा राग काढला बैलावर
पत्नीने दारू पिण्यास मनाई केली असता गावातील एका दारुड्याने पत्नीचा राग बैलावर काढून त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत बैलाचा पाय मोडला आहे. ही घटना पोळ्याच्या दिवशी अंत्री खेडेकर गावात घडली.

गावातील दारु बंद करण्यात येईल
अंत्री खेडेकर गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री महिला आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीने पूर्णपणे बंद करण्यात येईल. दारू विक्रेत्यांविरुद्ध कठाेर कारवाई करू.
-गणेश हिवरकर, ठाणेदार

गावातून दारु हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
दारू विरोधात लढा उभा राहण्याची वाट न बघता माझे गाव माझी जबाबदारी, मीच सांभाळणार या उद्देशाने गावातील दारु बंद करण्यासाठी, जिल्हा पोलिस अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, पोलीस स्टेशन अंढेरा यांना फेब्रुवारी महिन्यात लेखी तक्रार दिली होती. ती प्रशासनाने बेदखल केली. परंतु तरी सुध्दा गावातून दारु हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
-रामदास मोरे, पोलिस पाटील

बातम्या आणखी आहेत...