आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसन क्षमता:मनपाच्या मुख्य सभागृहाची आसन क्षमता वाढवण्याचे काम सुरू ; 11 सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था नव्याने केली जात आहे

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तीन सदस्यीय प्रभाग पद्धती तसेच यंदा ११ सदस्यांची मनपाच्या आम सभेत भर पडून एकूण सदस्य संख्या ९८ झाल्यामुळे मुख्य सभागृहात पुरेशी आसन क्षमता नाही. त्यामुळे त्याचा आकार वाढवण्याचे काम सुरू झाले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या दुसऱ्या माळ्यांवरील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आसन क्षमता वाढवण्याचे काम सध्या सुरू आहे. या ठिकाणी आणखी ११ सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था नव्याने केली जात आहे. तसेही या सभागृहाची दुरुस्ती करण्याची वेळ आली होती. या निमित्ताने सभागृह नव्याने चमकणार आहे. मनपा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू असून ही निवडणूक केव्हाही झाली तरी ९८ सदस्यांना बसण्यासाठी पुरेसे आसनं हवेत या दृष्टीने सभागृहाची दुरुस्ती केली जात आहे. तसेच त्यांना बसण्यासाठी आरामदायक आसनं बोलण्यासाठी माईकचीही व्यवस्था येथे राहील. मनपा निवडणुकीसाठी सदस्य संख्या जाहीर झाल्यानंतर लगेच तत्कालीन मनपा आयुक्त प्रशांत रोडे व प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सभागृहात आसन क्षमता वाढवली जाईल, असे स्पष्ट केले होते. तिसऱ्या माळ्यावर मनपा आयुक्तांच्या कक्षा चेही सध्या काम सुरू झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...