आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरखेड-लाडकी (चिमणाजी)-उदखेड रस्त्याचे काम कासवगतीने सुरु असल्यामुळे कित्येक महिन्यापासून वाहन चालक व विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करून या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. येथे यापूर्वी छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. सध्या या रस्त्याचे काम सुरु असून जुन्या रस्त्यावरचे डांबर काढून काठावर फेकण्यात आले, त्यामुळे वाहतुकीत आणखी अडचण निर्माण झाली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे या रस्त्यावरील निकृष्ट झालेली गीट्टी तिथेच दाबण्यात येत असून त्यावर नवीन गीट्टी टाकून रोडचे काम सुरु आहे. शिरखेड-लाडकी रस्त्याचे ३ कि.मी काम पाच महिन्यापासून सुरु असून सुरुवातीला लाडकी येथील नागरिकांनी निकृष्ट गिट्टीचा वापर केल्यामुळे काम बंद पाडले होते. आतादेखील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. शिरखेड-लाडकी-उतखेड या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता १.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते हे काम सुरु करण्यात आले. त्यानुसार हा रस्ता अमरावती-मोर्शी महामार्गाला जोडला गेला. परंतु ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोई सुविधा टक्केवारीच्या ग्रहणामुळे दर्जेदार होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.
ग्रामीण भागांना जोडणारे बहुतांश रस्ते भ्रष्टाचारामुळे पार उखडून गेलेले आहेत. त्यामुळे याही रस्त्याची विल्हेवाट तशीच लागणार का, अशी नागरिकांना शंका आहे. दरम्यान रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल अशा इशारा माजी मंत्री तथा आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी भूमिपूजनावेळी दिला होता. त्यामुळे आमदारताईंनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.