आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:ट्रकमधील मार्बल अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वलगाव येथील ‘सिकची रिसोर्ट’मध्ये बांधकामासाठी आणलेल्या मार्बल शीट ट्रकमधून खाली उतरवण्यासाठी आलेल्या एका २४ वर्षीय कामगाराचा मार्बलखाली दबून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ५) घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेख सलमान शेख सलीम (२४, रा. नवसारी) असे मृत कामगाराचे नाव आहे. शेख सलमान व अन्य पाच कामगार असे एकूण सहाजण बुधवारी सकाळी ११ वाजता ‘सिकची रिसोर्ट’मध्ये नागपूरहून आलेल्या ट्रकमधील मार्बलच्या शीट्स खाली उतरवण्यासाठी आले होते. ट्रकमध्ये दोन्ही बाजूने प्रचंड वजनी मार्बल शीट्स ठेवलेल्या होत्या. त्या खाली उतरवण्यासाठी शेख सलमानसह अन्य तिघे ट्रकमध्ये चढले.

यावेळी ट्रक थोडा मागे घेत असताना ट्रकचे एक चाक फसल्यासाखे झाले आणि दोन्ही बाजूने असलेल्या मार्बलच्या शीट एका बाजूने झुकल्या. यावेळी तिन्ही कामगार दोन्ही शीटच्या मधोमध उभे होते. यावेळी दोघांनी खाली उड्या घेत स्वत:चा जीव वाचवला, मात्र शेख सलमानला ते शक्य झाले नाही व तो ट्रेकमधील मार्बलच्या शीट्स खाली दबला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वलगावचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी शेख सलमानचे नातेवाईकसुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. या प्रकरणी गुरुवारी दुपारपर्यंत वलगाव पोलिसांत तक्रार आली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...