आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीकारली 2 हजारांची लाच:मनपाच्या स्वास्थ निरीक्षकासह कामगार ‘एसीबी’च्या जाळ्यात व्यावसायिकाकडून स्वीकारली 2 हजारांची लाच

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापडी पिशव्या विक्री करून दुकान चालवू देण्यासाठी एका व्यावसायिकाकडून २ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेच्या स्वास्थ निरीक्षकासह सफाई कामगारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. १) दुपारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर करण्यात आली आहे. कंत्राटी स्वास्थ निरीक्षक विलास रतन डेंडुले (३७) व सफाई कामगार तिलक विनोद ढेंडवाल (३४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदार यांचे इतवारा बाजार येथे दुकान आहे. कापडाच्या पिशव्या विक्री करण्यासोबतच दुकान चालवू देण्यासाठी स्वास्थ निरीक्षक विलास डेंडुले यांनी तक्रार कर्त्या व्यावसायिकास प्रति महिना ३ हजार रुपये लाचेची मागणी केली.

या प्रकरणी तक्रारदार व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावर शुक्रवारी दुपारी सापळा रचण्यात आला. स्वास्थ निरीक्षक विलास डेंडुले यांच्या सांगण्यावरून सफाई कामगार तिलक ढेंडवाल यांनी तक्रारदार व्यावसायिकाकडून लाचेची २ हजारांची रक्कम स्वीकारताच सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही अटक केली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक अरुण सावंत, देवीदास घेवारे, उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश उमरे, पोलिस निरीक्षक अमोल कडू, युवराज राठोड, नीलेश महिंगे, सतीश किटुकले आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...