आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार (दि.८) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. यामध्ये शहरातील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी राईट राजपूत याने ६०० पैकी ५६३ गुण (९३.८३ टक्के) मिळवले. राईटच तालुक्यातून प्रथम असल्याची शहरात जोरदार चर्चा होती.
आदर्शचा एकूण निकाल १०० टक्के लागला आहे. तर सृष्टी राणे, प्रणाली गावंडे अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी राहिल्या. अनेक वर्षाची उत्तम निकालाची परपंरा यावर्षीही कायम राखत प्रबोधन कनिष्ठ महाविद्यालयाचा कला, वाणिज्य, विज्ञान शाखा मिळून एकूण निकाल ९८ टक्के लागला आहे. विज्ञान, वाणिज्य, कला शाखेच्या एकूण ४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी ४०९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. ‘प्रबोधन’च्या विज्ञान शाखेतून सर्वाधिक गुण घेत प्रथम ऋतुजा निताळे हिला (९१) टक्के, वाणिज्य शाखेतून प्रथम कल्याणी अरबटला (८७.१७) टक्के तर कला शाखेतून प्रथम खुशी हदिमनी (८५) टक्के गुण मिळवत प्रथम स्थानी आहे. प्रबोधन महाविद्यालयाचे ९७ विद्यार्थी विशेष नैपुण्य प्राप्त गुणवत्ता यादीत झळकलेत तसेच २५३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर प्रबोधनमधील वाणिज्य व एमसीव्हीसी शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
जे. डी. पाटील सागळुदकर महाविद्यालयातून कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे एकूण २१३ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. जे. डीच्या कला शाखेचा एकूण निकाल ८७.९४ टक्के असून एकूण निकाल ९२.०१ टक्के लागला आहे. उ.ना लोणकर कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ९२.८५ टक्के लागला आहे. येथील कला, वाणिज्य व एमसीव्हीसी मिळून परीक्षेला १६२ विद्यार्थी बसले. त्यापैकी १५० विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर मौलाना आझाद उर्दू हायस्कूलचा एकूण निकाल ९४.२८ टक्के लागला.पाचही शाळेच्या सर्व गुणवंत विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय प्रचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, वर्गशिक्षक, विषय शिक्षक व आई- वडीलांना देतात. बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
दर्यापूर तालुक्याचा एकूण निकाल ९५.७९ टक्के
दर्यापूर तालुक्यातून यावर्षी बारावीच्या परीक्षेला २ हजार ४४३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ३२२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. शहरातील आदर्श हायस्कूलसह ग्रामीण भागातील ४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला हे विशेष. तर ठिकठिकाणच्या १५ शाळांचा एकूण निकाल ९० टक्केच्या वर लागलेला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.