आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातब्बल तीन वर्षांनतर यंदा राज्यात पोलिस भरती सुरू झाली आहे. मुंबई वगळता राज्यात एकाचवेळी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे गृह विभागाने जाहीर केले होते. त्यानुसार अमरावती शहर व ग्रामिण पोलिस दलातील चालक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा १९ मार्चला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.
ही परीक्षा संबधित घटक प्रमुखांना आपआपल्या कार्यक्षेत्रात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे शहर पोलिस दलात पोलिस आयुक्त तर ग्रामीणमध्ये पोलिस अधीक्षक लेखी परिक्षेसह संपूर्ण भरती प्रक्रियेचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वीच्या भरतीपर्यंत लेखी परीक्षा संबधित घटक प्रमुख आपआपल्या सोयीनुसार घेत होते, तसेच वेळेबाबत बंधन नसल्यामुळे शक्यतो सकाळच्यावेळी परीक्षा घेतली जायची, त्यामुळे बहुतांश वेळी मैदानातच लेखी परीक्षा व्हायची. मात्र यंदा राज्यभरात एकाचवेळी लेखी परिक्षा होणार असून वेळ ११ वाजताची असल्यामुळे त्या वेळी ऊन झालेले राहणार आहे.
१०० गुणांच्या परीक्षेसाठी दीड तासाचा अवधी चालक पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा ९० मिनिटांची राहणार असून, त्यामध्ये उमेदवारांना अंकगणित, सामान्यज्ञान व चालू घडमोडी, बुद्धीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि वाहतुकीच्या नियमांबाबत प्रश्न विचारल्या जाणार आहेत. लेखी परीक्षा एकूण १०० गुणांची राहणार आहे. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.