आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन पद्धत:अकरावी प्रवेश प्रक्रिया; तिसऱ्या यादीसाठी 1314 प्रवेशनिश्चित

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, दोन फेऱ्या पार पडल्या आहेत. प्रवेशाची तिसरी यादी जाहीर झाली असून, १ हजार ३१४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. आजपासून तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. २४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन समिती समन्वयक प्रा. अरविंद मंगळे यांनी केले आहे.

शहरात अकरावी प्रवेशाकरिता ऑनलाइन केंद्रीय पद्धत राबवली जात असून, याकरिता विद्यार्थ्यांना शहरातील विविध शाळांमध्ये प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन अकरावी प्रवेश समितीच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर याची पडताळणी समितीने केली. यातून गुणवत्ता यादी तयार करून त्यांची प्रसिद्धी करण्यात आली होती. यामध्ये प्रथम प्रवेश फेरीमध्ये पसंती क्रम नोंदवलेल्या ५ हजार ९२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी कोटा प्रवेश फेरीत ९९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. तसेच द्वितीय फेरीत ६ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. त्यानंतर आता तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. तिसरी गुणवत्ता यादी विभागाने जाहीर केली असून १ हजार ३१४ प्रवेश निश्चित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...