आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या हक्कांच्या पाण्यासाठी छेडले भजन आंदोलन:गुरूकुंज उपसा सिंचन प्रकल्पस्थळी यशोमती ठाकुरांचा दोन तास ठिय्या

प्रतिनिधी | तिवसाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांच्या हक्कांच्या पाण्यासाठी आंदोलन करीत ठिय्या देताना आमदार यशोमती ठाकूर व उपस्थित नागरिक. - Divya Marathi
शेतकऱ्यांच्या हक्कांच्या पाण्यासाठी आंदोलन करीत ठिय्या देताना आमदार यशोमती ठाकूर व उपस्थित नागरिक.

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या गुरूकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पस्थळी शनिवारी (दि. ५) सायंकाळी सहा वाजता माजी पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी ठिय्या आंदोलन छेडले. प्रकल्पात झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या घटनेबाबत संताप व्यक्त करीत हे आंदोलन छेडण्यात आले. यात ठिय्या व भजन आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले.

गुरूकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पात झालेली लाखो रुपयांच्या विद्युत साहित्याची चोरी ही अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे झाली असल्याने ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह थेट प्रकल्प स्थळी साहित्य येईपर्यंत दोन तास ठिय्या आंदोलन व भजन आंदोलन करून प्रशासनाला व सरकारला घाम फोडला.

या प्रसंगी माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. रघुनाथ वाडेकर, काँग्रेस कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख, नगराध्यक्ष योगेश वानखडे, वैभव वानखडे, पंचायत समितीच्या सभापती रोशनी पुनसे, उपसभापती शरद वानखडे, सदस्य निलेश खुळे, सत्तार मुल्ला,कल्पना दिवे, नरेंद्र विघ्ने, अमर वानखडे, सेतू देशमुख, मुकूंद पुनसे, सतीश पारधी, अर्चना खारोडे, जसबीर ठाकूर, पिंटू राऊत, सुनील बाखडे, शेख राजीक, वैभव काकडे, दिलीप वानखडे, अनिल डीक्कर, नंदू पोलगावंडे, सुरज गडलिंग, संदीप ठाकूर, किशोर दिवे, सुनील राऊत तसेच पोलिस व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते.

ठिय्या आंदोलनात भजन आंदोलन

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी प्रकल्पस्थळी यशोमती ठाकूर यांनी कार्यकर्ते व शेतकऱ्यांना सोबत घेवून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनात एक तासानंतर भजन आंदोलन करण्यात आले. ज्यामुळे रात्रीच्या अंधारात प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली.

बातम्या आणखी आहेत...