आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा संकुल:योगदिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुलात मंगळवारी योग कार्यक्रम ; आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येणार

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मानवतेसाठी योग’ (योगा फॉर ह्युमॅनिटी) असे ब्रीद घेऊन यंदाचा आंतरराष्ट्रीय योगदिन मंगळवारी २१ जून रोजी साजरा करण्यात येत आहे. शासनाचे विविध विभाग व संघटनांच्या सहकार्याने अमरावतीत विभागीय क्रीडा संकुलात २१ रोजी सकाळी ७ ते ८ या कालावधीत योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी दिली. योगशास्त्र ही प्राचीन भारतीय संस्कृतीची अवघ्या जगाला मिळालेली अमूल्य देणगी आहे. योग व्यक्तीला अंतर्बाह्य निरोगी करून दीर्घायुष्य प्रदान करते. जीवन तणावमुक्त, भयमुक्त व निरामय राहण्यासाठी योगाचा स्वीकार सर्वत्र व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे.

विभागीय क्रीडा संकुलातील कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी, ज्येष्ठ योग प्रसारक, क्रीडापटू उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतान, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी यांनी केले आहे. क्रीडाप्रेमी व नागरिकांनी विभागीय क्रीडा संकुलात स. ६.३० वा.उपस्थित राहावे. पाण्याची बाटली व चटई सोबत आणावी, असे आवाहनही त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...