आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक:युवकाचे अपहरण करून प्रेयसीशी जबरीने लावले लग्न, प्रेयसीकडून युवकाचे अनेकदा लैंगिक शोषण

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युवकाच्या तक्रारीवरून नर्ससह तिच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा

एखाद्या युवतीचे अपहरण करुन तिचे जबरीने लग्न लावण्यात आले, असे अनेकदा आपण वाचले आहे, ऐकले आहे. मात्र हे प्रकरण उलट आहे. चक्क एका २८ वर्षीय ‘एमआर’ (आैषध विक्रेता प्रतिनिधी) असलेल्या युवकाचे प्रेयसीच्या दोन मित्रांनी अपहरण केले. त्याला मारहाण करुन खंडणी मागितली आणि त्यानंतर बळजबरीने त्या युवकाचे नर्स असलेल्या त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावून दिले. त्यानंतर त्याला खंडणीसुद्धा मागितली. हा धक्कादायक प्रकार ८ जानेवारी २०२१ रोजी घडला असून, युवकाच्या तक्रारीवरून राजा पेठ पोलिसांनी बुधवार, दि. १९ मे रोजी रात्री नर्स युवतीसह तिच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विशाल (काल्पनिक नाव, २८ वर्ष) असे तक्रारदार युवकाचे नाव आहे. विशाल आणि नर्स युवती हे दोघेही मुळचे वाशीम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यांचे एकमेकांवर मागील पाच वर्षांपासून लग्न न करण्याच्या अटीवर प्रेमसंबंध होते. असे विशाल तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, ८ जानेवारी २०२१ ला रात्री विशाल ची प्रेयसी असलेल्या नर्सने विशालच्या घरी अजय वानखडे (रा. अकोला) याच्यासह दोन युवकांना पाठवून त्याला जबरीने शहरातील पीडीएमसीजवळ दुचाकीवर बसवून आणले. यावेळी त्या दोन युवकांनी व नर्सने विशालला आताच्या आता माझ्यासोबत लग्न कर, अशी मागणी केली. मात्र, विशाल नकार दिला तर त्या दोन युवकांनी विशालला मारहाण केली. या प्रकारानंतर विशाल त्याच दिवशी रात्री गाडगेनगर पोलिसांत पोहोचला मात्र, पोलिसांत त्याने लेखी तक्रार दिली नव्हती.

दरम्यान, त्यानंतर विशाल, त्याची प्रेयसी नर्स व दोन युवक हे ठाण्यातून बाहेर पडले. त्यानंतर विशालला जबरीने शहरातील वडाळी परिसरात नेले. त्या ठिकाणी पुन्हा विशालला अजय वानखडे व त्याच्या सहकाऱ्यांनी मारहाण करुन रात्रभर एका ठिकाणी डांबून ठेवले. दरम्यान, हे प्रकरण मिटवायचे असेल तर आताच दोन लाख रुपये आणि दोन स्टॅम्प पेपर बोलावून घे, अशी धमकी दिली. त्यामुळे विशाल त्याच्या दोन मित्रांना सांगून ९ जानेवारीला सकाळी दोन कोरे स्टॅम्प पेपर आणि एक लाख रुपये घेऊन बोलावले. ही रक्कम नर्स व तिच्या दोन मित्रांना दिल्यानंतर त्यांनी विशालला सांगितले की, तुला जर या प्रकरणातून स्वत:ची सुटका करायची असेल तर नर्सच्या गळ्यात हार टाकण्याचे म्हणजेच लग्न करण्याचे नाटक करावे लागेल. त्यावेळी धमकावून मला लग्न करायला लावले, असे विशाल तक्रारीत नमूद केले आहे. हार टाकतेवेळीचे फोटोही अजय वानखडे याने काढले. तसेच त्यानंतर कोऱ्या स्टॅम्प पेपरवर विशालच्या सह्या घेतल्या आणि त्याला धमकी देवून त्या ठिकाणाहून सोडून दिले. तसेच आणखी पाच लाख रुपयांची तातडीने व्यवस्था कर, अशी धमकी देवून आणखी खंडणी मागितली.

युवकाकडून उकळली लाखोंची खंडणी
पाच लाख रुपये दिले तर लग्न केल्याचे हे पुरावे फाडून टाकू आणि तू जर या प्रकाराबाबत कोणाजवळही वाच्यता केली तर तुला मारुन टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतरही वारंवार कॉल करुन विशालला पैशांची मागणी केली जात होती. विशालने ही तक्रार बुधवारी राजापेठ पोलिसांत केल्यानंतर पोलिसांनी विशालची प्रेयसी असलेली नर्स, आकाश वानखडे व आकाश सोबत असलेल्या युवकांविरुद्ध अपहरण करुन खंडणी मागणे, मारहाण करणे, धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिस तपास करत आहेत.

परतवाड्यात जावूनही केली होती मारहाण
विशालला जानेवारी महिन्यांपासून खंडणी मागितली जात असून, त्यासाठीच त्याला त्रास सुरू होता. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात परत वाड्यात जावून याच दोघांनी विशालला मारहाण केली होती.

नर्सने केले युवकाचे अनेकदा लैंगिक शोषण
दरम्यान, नर्स असलेल्या युवतीने मागील काही दिवसांत अनेकदा आपले जबरीने लैंगिक शोषण सुद्धा केल्याची धक्कादायक बाब विशालने पोलिस तक्रारीत नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नर्सच्या तक्रारीवरून केली होती विशालला अटक

या प्रकरणात (काल्पनिक नाव) विशाल याच्याविरुद्ध नर्सने कारंजा लाड पोलिस ठाण्यात मार्च २०२१ मध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी विशाल विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली हाती. दरम्यान या प्रकरणात विशाल तब्बल ४० दिवस कारागृहात होता. त्याची १३ मे रोजी जामिनावर कारागृहातून सुटका झाली असल्याची माहिती अमरावती येथील राजा पेठ पोलिस सूत्रांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...