आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:'आई-बाबा, माफ करा.. जेथून आयुष्य सुरू केले तेथेच संपवतोय’ असे लिहून तरुणाची आत्महत्या

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रतिष्ठित कापड व्यावसायिक अशोक जिवतानी यांच्या धाकटा मुलगा ललित अशोक जिवतानी (२७) या विवाहित तरुणाने शहरातील फॉरेस्ट डेपो रोडवरील गणेश मंदिराच्या लोखंडी दरवाजाला गळफास घेवून शनिवारी आत्महत्या केली.

ही घटना शनिवारी (दि. २०) सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून मृत ललितच्या खिशातून पोलिसांना चार पानी चिठ्ठी मिळाली असून, त्यात ललितने ‘मै डिप्रेशन से निकल नही पा रहा हुँ. मैने जहाँसे जिंदगी शुरू की वहाँ समाप्त कर रहा हूँ. मम्मी-पप्पा मुझे माफ कर दो...’ अशा आशयाचा उल्लेख चिठ्ठीत नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहरात ‘संस्कृती शोरुम’, ‘संस्कृती फॅशन’ अशा प्रकारची चार प्रतिष्ठान असून होलसेल कापड व्यापारी म्हणून अशोक जिवतानी यांची ओळख आहे. जिवतानी यांना दोन मुले असून मोठा आशिष, तर ललित लहान आहे. ते दोघेही विवाहित असून ब्राह्मण-सभा कॉलनीतील निवासस्थानी एकत्र राहतात. मिळालेल्या माहितीनुसार ललितचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्याला पाच महिन्यांची मुलगी आहे. घटनेच्या दिवशी मध्यरात्री घरातून बाहेर पडल्याचे सांगण्यात येते.

गळफास घेण्याचा केला होता सराव
विशेष म्हणजे, ललितने ज्या पद्धतीने गळफास घेतला, त्यावरून गळफास घेण्याच्या अनुषंगाने त्याने तशा पद्धतीने वारंवार सराव केला असावा. कारण दोरीला त्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचे दिसून येते. ललित हा अत्यंत कमी बोलणारा होता. मात्र तो नेहमी तणावात राहात असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...