आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लिप व्हायरल:लग्नानंतर अवघ्या 22 व्या दिवशी तरुणाची आत्महत्या ; लसणापूर गावातील घटना

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नानंतर अवघ्या बाविसाव्या दिवशी एका २८ वर्षीय तरुणाने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना चांदूर बाजार तालुक्यातील लसणापूर येथे ९ जूनला उघड झाली. सद्या सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. या क्लिप्स मृत तरुणाच्या आवाजातील असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात मृताच्या भावाने तसेच मृताच्या पत्नीने सुद्धा परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणात आसेगाव पूर्णा पोलिस सखोल चौकशी करत आहेत. अंकुश नंदकिशोर तळकित (२८, रा. लसणापूर, चांदूरबाजार) असे मृत तरुणाचे नाव आहे. अंकुशचे १८ मे २०२२ ला एका तरुणी सोबत रितसर लग्न झाले. त्यानंतर मात्र अवघ्या बाविसाव्या दिवशी म्हणजेच ९ जूनला अंकुशने शेतात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबीयांना अंकुशच्या मोबाइलमध्ये काही ऑडिओ क्लिप मिळाल्या. त्यानंतर अंकुशचे मोठे भाऊ प्रवीण तळकित यांनी आसेगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनुसार, अंकुशच्या घरी आई, मोठा भाऊ, वहिनी असे एकत्रित कुटूंब आहे. दरम्यान, लग्नानंतर अवघ्या आठ ते दहा दिवसात अंकुशची पत्नी सासरच्या मंडळीसोबत व्यवस्थित वागत नसल्याचे त्याला लक्षात आले, त्यामुळे त्याने पत्नीला ८ जूनला माहेरी नेऊन सोडले. दरम्यान, तो घरी परत आला असता त्याने भावाला व आईला सांगितले की, मला सासू व पत्नीने माझ्यासोबत भांडण करुन अपमानित केले आहे. त्यावेळी तो रडायला लागला. दरम्यान, ९ जूनला त्याने आत्महत्या केली. सासू व पत्नीने दिलेल्या अपमानित वागणुकीमुळेच अंकुशने आत्महत्या केली असल्यामुळे दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत प्रवीण तळकित यांनी केली आहे. दरम्यान, अंकुशच्या पत्नीने सुद्धा आसेगाव पोलिसांत तक्रार देवून अंकुशच्या आत्महत्येला त्याच्या कुटुंबातील सदस्य जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

दोन्ही तक्रारींची चौकशी

या प्रकरणात आम्ही घटनेच्या दिवशीच आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृताचा भाऊ व मृताच्या पत्नीने परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. त्या दोन्ही तक्रारींची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. त्याचीसुद्धा पडताळणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिलन कोयल,ठाणेदार, आसेगाव.

बातम्या आणखी आहेत...