आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जयस्तंभ चौक ते गुजरीबाजार या मार्गावरील टेकाडे कॉम्प्लेक्स येथे ८ ते ९ रुम राहण्यासाठी भाड्याने दिल्या जातात. या रुमवर अमरावती शहरातील एक युवक व अचलपूर शहरातील एक युवती दोघेही बुधवारी (दि. २९) दुपारी ११ ते १२ च्या सुमारास आले असता, काही युवकांना ही माहिती मिळताच त्यांनी लॉजवर जाऊन काचेचा टी टेबलची तोडफोड केली. कॉम्प्लेक्सचे संचालक उज्ज्वल टेकाडे यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस दाखल होत अमरावती येथील युवकाला ताब्यात घेतले, तर अचलपूरातील ती युवती हल्ला करणाऱ्या युवकांसोबत निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहराच्या मध्यभागी असणाऱ्या या कॉम्प्लेक्समध्ये लॉज स्वरुपात रुम भाड्याने दिल्या जातात.
मिळालेल्या माहितीनुसार, या लॉजवर मोठ्या प्रमाणात युवक-युवतींचे येणे-जाणे असून, या लॉजवर गैरप्रकार होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. आज एक युवक व युवती या लॉजवर दिसताच काही युवकांनी त्यावर आक्षेप नोंदवत उज्ज्वल टेकाडे यांच्यासोबत वाद घालत तोडफोड केली. येथे अनेकदा युवक-युवतींचा राबता असतो. त्यामुळेच त्या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याची बाब शहरातील नागरिकांमध्ये चर्चीला जात आहे. उज्ज्वल टेकाडे यांनी मात्र या बाबीला नाकारत कॉटप्रमाणे विद्यार्थ्यांना रुम भाड्याने दिल्या जातात, तर एक रुम लॅबसाठी देण्यात आल्याची माहिती दिली.
दरम्यान या घटनेच्या अनुषंगाने त्या युवकासोबत असणाऱ्या युवतीने कुठलीच तक्रार न दिल्याने त्या युवकाला सोडून देण्यात आले, तर टेकाडे यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. लॉजची तपासणी केव्हा?: पोलिस यंत्रणेकडून नेहमी लॉजींग, हॉटेल आदींची माहिती घेत चौकशी केली जाते. जेणेकरून लॉजवर मुक्कामी असणाऱ्या संशयास्पद गुन्हेगारांचा शोध घेतला जाऊ शकेल. मात्र या घटनेमुळे पोलिसांचे दुर्लक्ष उघडकीस आले आहे.
लॉजमध्ये नियामावलीचे योग्य पालन होत नाही
कॉम्प्लेक्समध्ये उज्ज्वल टेकाडे यांनी रुम भाड्याने देत कॉटप्रमाणे उपलब्ध केलेल्या आहेत. मात्र याकरिता पालिका प्रशासन व इतर परवानगी आवश्यक आहे. लॉजींग नियमाचे कुठलेच पालन टेकाडे यांनी केल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी एखादी घटना झाल्यास राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी बाहेर निघण्यासाठी योग्य व्यवस्था नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.