आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकी:प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीला‎ परीक्षा केंद्रात जाऊन मारहाण‎, तरुणाविरुद्ध गुन्हा; मुलीच्या वडिलांनाही केली दमदाटी‎

अमरावती‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात राहणाऱ्या एका तरुणीचा पाठलाग‎ करुन ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे एका‎ तरुणाने तरुणीला म्हटले. मात्र, तरुणीने‎ त्याला नकार दिला. यामुळे संतापलेल्या‎ तरुणाने तरुणीचा पाठलाग करुन ती‎ परीक्षेसाठी गेली असता परीक्षा केंद्रावर‎ जाऊन तिला मारहाण केली. इतकेच नाहीतर‎ परीक्षा केंद्राबाहेर तरुणीचे वडील उभे होते.‎ त्यांनाही या ‘मजनू''ने शिवीगाळ करुन‎ मारण्याची धमकी दिली.

ही घटना सोमवारी‎ (दि. ८) घडली असून, तरुणीच्या‎ तक्रारीवरुन तरुणाविरुद्ध राजापेठ पोलिसांनी‎ गुन्हा दाखल केला आहे.‎ राहुल वानखडे (२२, रा. जेवडनगर,‎ अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या‎ तरुणाचे नाव आहे. २७ फेब्रुवारी २०२३ पासून‎ तरुणी कॉलेजमध्ये ये-जा करताना राहुल‎ तिचा पाठलाग करत होता. दरम्यान, ‘माझे‎ तुझ्यावर प्रेम आहे’, असे तो तरुणीला‎ म्हणाला. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला.

‎ त्यामुळे त्याने तरुणीला यापूर्वी थापडाने‎ मारहाण केली होती. दरम्यान, ८ मे २०२३‎ रोजी तरुणीची परीक्षा असल्यामुळे ती‎ शहरातील एका परीक्षा केंद्रावर पोहोचली.‎ त्यावेळी या मजनूने तिचा पाठलाग करुन थेट‎ परीक्षा केंद्र गाठले आणि वर्गात जाऊन तिला‎ शिवीगाळ करुन मारहाण केली तसेच तिच्या‎ अंगातील कपड्यांची ओढाताण केली.‎ यावेळी तरुणीचे वडील परीक्षा केंद्राबाहेर‎ थांबले होते, राहुल वानखडे याने त्यांनाही‎ शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली‎ तसेच तरुणीला त्या ठिकाणी पुन्हा ओढाताण‎ करुन खाली पाडले आणि थापांनी मारहाण‎ केली.

या प्रकारानंतर तरुणीने तत्काळ‎ राजापेठ पोलिस ठाणे गाठून राहुलविरुद्ध‎ तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी‎ राहुल वानखडेविरुद्ध विनयभंग करणे,‎ मारहाण करणे, धमकी देणे आदी कलमान्वये‎ गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती‎ पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.‎