आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रपरिषद:युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांचा ‘निश्चय’ दौरा : पत्रपरिषदेत माहिती

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज युवासेना निश्चय दौरा, मेळावा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार असून याला युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात पाचही जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अशी माहिती युवासेना अमरावती जिल्ह्याच्या वतीने देण्यात आली आहे.
मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी संकल्पना या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सरदेसाई यांचा निश्चित दौरा राज्यभर सुरू आहे. आज होणाऱ्या या मेळाव्यात युवासेना कोर कमिटी सदस्य रुपेश कदम, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीण पाटकर, निखिल जाधव, मुंबई येथील मनपा नगरसेवक समाधान सरवणकर, मंदार चौव्हान, विप्लव बाजोरिया, शार्दूल म्हाडगूत, योगेश निमसे, विशाल केचे, विभागीय सचिव सागर देशमुख, राज दीक्षित, अमित पेडनेकर, जितेश गुप्ता, गीता झगडे, प्रियंका जोशी उपस्थित राहणार आहे.

या मेळाव्याला शिवसैनिकांसह आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेत विभागीय सचिव सागर देशमुख, श्याम धाने, स्वराज ठाकरे, प्रमोद धानोरकर, निशांत हरणे, धीरज खोडस्कर, पियुशिका मोरे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...