आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:जामली आर येथे कुऱ्हाडीने वार करून तरुणाचा खून

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक व्यवहारावरून उद््भवलेल्या वादात एका ३० वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीने वार करुन खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना चिखलदरापासून ७० किलोमीटर अंतरावरील जामली आर येथे शुक्रवारी (दि. ४) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली.

ईश्वर रमेशराव चव्हाण (३५ रा. जामली आर) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी हिरालाल रामा जामूनकर (५९ रा. जामली आर), संजुलाल हिरालाल जामुनकर (३८) व एक महिला असे आरोपींचे नावे आहेत. हिरालाल याने ईश्वरला आपले शेत ३ हजार रुपयांत गुरे चराईसाठी दिले होते. मात्र, ईश्वरने त्याची रक्कम हिरालालला दिली नाही.

शुक्रवारी सकाळी आर्थिक व्यवहारावरून हा वाद उद्भवला. या वादात हिरालालने ईश्वरवर अचानक कुऱ्हाडीने हल्ला चढवला. यामध्ये ईश्वरचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी चिखलदरा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच चिखलदरा पोलिसांनी जामली आर गाव गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...