आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवनामध्ये घडणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या परिस्थितीनुसार आपण आईवडील, मित्र, भावंडे, शिक्षकांकडून मार्गदर्शन घे तो, परंतु आपल्या आयुष्यात अनेक असे वेगवेगळे टप्पे येतात, त्यामध्ये आपण कोणते करिअर निवडावे आणि आपल्यातील कौशल्ये कशी विकसित करावी, स्पर्धात्मक काळात आपण कसे वेगळे आहोत हे ओळखून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असा सूर करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केला. अमरावती येथील नेहरू युवा केंद्र व चिखलदरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त सहकार्याने चिखलदरा येथे नुकतीच करिअर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेत मेळघाटातील युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. आयटीआयचे संजय मार्शेटवर यांनी आयटीआयला प्रवेश कसा घेऊ शकतो, नोकरीची संधी या विषयी मार्गदर्शन केले. तसेच रूपेश डोंगरे यांनी मुलांना भविष्यात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन केले, तर नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांनी नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम व युवक मंडळ तयार करून सामाजिक कार्यात कसा सहभाग घेऊ शकतो, याविषयी माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.