आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती उत्साहात:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती उत्साहात

यवतमाळ6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहुजी साळवे निवृत्त कर्मचारी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बाळकृष्ण सरकटे तर प्रमुख अतिथी म्हणून साहेबराव खडसे, माणिकराव खडसे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमा पूजन व द्वीप प्रज्वलन करून करण्यात आले.

समाजातील ज्येष्ठ नागरिक श्रावण वानखेडे यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर पुष्पाताई तेलंगे, शालिनी पडघान यांनी प्रकाश टाकला. हिवराळे यांनी अण्णाभाऊ यांच्या साहित्यांची ओळख करून दिली. जगी बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव ही काळाची गरज आहे. नवतरूणानी अण्णाभाऊचे साहित्य वाचावे असे त्यांनी आपल्या भाषणातून आवाहन केले. प्रमुख अतिथी म्हणून साहेबराव खडसे, माणिकराव खडसे यांनी अण्णाभाऊ यांच्या जीवनावर सखोल विवेचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण सरकटे यांनी आध्यक्षिय भाषणात अण्णाभाऊ यांच्या लेखणीची ताकद व सामर्थ्य सांगितले. संचालन ओंकेश्र्वर हिवराळे तर आभार प्रदर्शन तुळशीराम गवळी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...