आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:104 कामांची घ्यावी लागणार नव्याने परवानगीव; 31 मार्चपर्यंतच्या मुदतीत पीएफएमएसवर अपलोड झालेच नाही, मुदत वाढवली

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक दोनच्या माध्यमातून ३०५४, ५०५४ तसेच अ, ब, क, ड मधील कामे चालू होती. यातील ३०५४ आणि ५०५४ च्या कामाचे देयके ३१ मार्च २०२२ पर्यंत पीएफएमएसवर अपलोड करणे अपेक्षीत होते. मात्र, यातील बहुतांश कामांना मुहूर्तच मिळाला नाही. परिणामी, आता नव्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. तर २०२०-२१ मधील अ, ब, क, ड मधील कामांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेला ३०५४, ५०५४ शीर्षकाखाली जिल्हा नियोजन समिती दरवर्षी कोट्यवधी रूपये देते. प्राप्त झालेल्या निधीतून जिल्हा परिषदेला दोन वर्षांत संपूर्ण कामे पूर्ण करून देयके काढणे अपेक्षीत राहते, परंतू बऱ्याच वेळा ही कामे अपूर्णच राहतात. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांकडून नव्याने परवानगी घेण्याची वेळ प्रशासनावर येते. असाच काहीसा प्रकार यंदा जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोनमध्ये घडला आहे. सन २०२०-२१ मध्ये ३०५४ हेडवर २० कोटी आणि ५०५४ हेडवर २५ कोटी ७० लाख रूपये प्राप्त झाले होते. यातील ३०५४ मधून ५९ कामे, तर ५०५४ मधून ४५, असे दोन्ही मिळून १०४ कामे प्रस्तावित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने निविदा प्रक्रीया राबवण्यात आली होती. त्यातून प्राप्त झालेल्या कमी दराच्या निविदेला हिरवी झेंडी दाखवत वर्कऑर्डर काढण्यात आली होती. ही कामे मार्च २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करणे अपेक्षीत होते, परंतू ह्यातील ३०५४ मधील केवळ ७ ते ८ कामे पूर्णत्वास आली असून, पीएफएमएसवर चढविण्यात आली आहे. उर्वरीत कामे करताना प्रशासनासमोर मोठ्या अडचणी उभ्या टाकल्या आहेत. त्यामुळे ह्या कामासाठी आता नव्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम क्रमांक दोनच्या माध्यमातून अ, ब, क, ड ह्या वर्ग वारीतील कामे प्रस्तावित होती. सध्या प्रस्तावित असलेली कामे चालू असून, कुठलेही काम पीएफएमएसवर अपलोड करण्यात आले नाही.

बातम्या आणखी आहेत...