आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालखेड उपकेंद्रात प्रकार:108 वाहन चालकाच्या उचित प्रसंगावधानामुळे उपकेंद्रात प्रसूती ; बाळाचे जीव वाचवले

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसवकळा येणाऱ्या गर्भवती महिलेला उपचारांकरिता १०८ वाहनाने यवतमाळ येथे आणत होते. अशात प्रसव वेदना वाढल्याची माहिती होताच चालकाने प्रसंगावधान दाखवीत मालखेड उपकेंद्रात दाखल केले असता, उपस्थित डॉक्टर, आरोग्य सेविका, आशा, मदतनिसांच्या साहाय्याने प्रसूती केली. हा प्रकार सोमवार, ५ सप्टेंबर रोजी घडला. आता दोघांची प्रकृती चांगली असून, यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

दारव्हा तालुक्यातील लोही येथे राहणारी गरोदर माता जया रजनीश इंगोले वय २५ कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच प्रसव कळा सुरु झाल्या. त्यामुळे महिलेला ग्रामीण रुग्णालय येथे गेली होती. मात्र, ती जोखमीची माता असल्याने तिला सोमवार, दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान १०८ रुग्णवाहिकेने यवतमाळ जिल्हा रुग्णालयात रेफेर करण्यात आले होते, परंतु नेर मार्गे यवतमाळला येत असताना वाटेतच मालखेड उपकेन्द्रानजिक त्या मातेला वाहनातच प्रसव वेदना वाढून बाळ बाहेर येत होते. तेवढ्यात वाहन चालक संदीप शेंडे यांनी उपकेंद्रात उपस्थित आरोग्य सेविका जया वेळूकार, कविता राउत, आशा जयश्री पिलावन, जयश्री ठाकरे, मदतनीस आशा बोबडे यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ संबधित बोरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल भूसखंडे, डॉ. जया आड़े यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र दुर्गे यांना माहिती देवून सर्वांशी समन्वय साधुन उपकेंद्रात सुखरूप प्रसूती केली. यात १७०० ग्राम वजनाच्या बाळाला जन्म दिला. वार्म किट, प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात रेफेर केले. या घटनेची तात्काळ दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पि.एस. चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. बी. गाढवे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. पि. एस .ठोंबरे यानी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले.

बातम्या आणखी आहेत...