आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्वरीत काम:अर्धवट कंपाऊंडच्या कामाचे काढले 11 लाख ; मुख्याधिकाऱ्यांना काम सुरू करावी, अशा सूचना

यतवमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लक्ष्मी नगर (वॉर्ड क्रमांक २३) येथील ओपन स्पेसला कंपाऊंडचे काम अर्धवटरीत्या झाले आहे. तरीसुद्धा पन्नास टक्के रक्कम कंत्राटदाराला अदा करण्यात आली आहे. यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना काम सुरू करावी, अशा सुचना दिल्या होत्या. मात्र, अद्यापपर्यंत कुठल्याही स्वरूपाचे पावले पालिकेने उचलले नाही. यावरून पालिकेचेही दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

शहरातील वॉर्ड क्रमांक २३ मध्ये येणाऱ्या लक्ष्मी नगर परिसरात एक ओपस्पेस आहे. या ओपन स्पेसला लागूनच महानंद नगर लागून आहे. या ठिकाणच्या कामाकरता २० लाख रूपये मंजूर करण्यात आले होते. त्या अनुषंगाने डिस्मेंटल, कॉलम, चेन लिंकिंग फेसिंग, वॉल कंम्पाऊंड, स्टिल ग्रील, रंगरंगोटी, यासह इतरही कामे ह्या निधीच्या माध्यमातून करण्यात येणार होती. त्या अनुषंगाने प्रत्यक्षात कामाला सुरूवात करण्यात आली. लक्ष्मी नगरच्या तीन बाजूचे काम पूर्ण झाले आहे. वॉलकंम्पाऊडला प्रवेशव्दारसुद्धा बसविण्यात आले आहे, परंतू महानंद नगरातील बाजुचे काम अर्धवटरीत्या राहिले आहे. या ठिकाणी अतिक्रमण असल्यामुळे काम रेंगाळल्याचा आरोप नागरिकांतून केल्या जात आहे. यासंदर्भात पालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, पालिकेने कुठलेही पावले उचलली नाही. शेवटी लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना काम सुरू करण्याबाबत आदेशित केले होते.

‘त्या’ वृक्षाची कत्तल
महानंद नगरातील ओपन स्पेसमध्ये एक जूने वृक्ष होते. वॉल कंपाऊंडचे काम सुरू करण्यापूर्वीच झाड कापून टाकण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात होते. आता अर्ध्याहून अधिक काम शिल्लक आहे. त्यामुळे झाड तोडण्याची काय गरज होती, असा प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...