आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 कोटी 90 लाख रुपये अनुदानाचे वाटप‎:नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा‎ 12 हजार 478 शेतकऱ्यांनी घेतला लाभ‎

वाशीम‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडच्या काळात हवामानात झालेल्या‎ लक्षणीय बदलांमध्ये कृषी क्षेत्रापुढे मोठी‎ आव्हाने उभी राहत आहे. हवामान‎ बदलानुकूल कृषी विकासाकरिता तसेच‎ प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना घटत्या‎ उत्पन्नामुळे तणावग्रस्त न होता पूर्वीच्या‎ सुस्थितीत ताबडतोब पुनर्स्थापित होता यावे‎ म्हणून कृषी क्षेत्र व पर्यायाने शेतकऱ्यांनी सक्षम‎ हाेण्यासाठी हवामान अनुकूल कृषी प्रकल्प‎ अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प‎ (पोकरा) जिल्ह्यातील १४९ गावांतील‎ शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे. या‎ गावातील १२ हजार ४७८ शेतकरी लाभार्थ्यांना‎ विविध २८ घटकांचा लाभ देऊन त्यांच्या बँक‎ खात्यात ३२ कोटी ९० लक्ष ७६ हजार रुपयांचे‎ अनुदान वितरित करण्यात आले.‎

अवकाळी पाऊस, गारपिटीसारख्या‎ नैसर्गिक संकटांना वारंवार तोंड द्यावे लागत‎ आहे. परिणामी तीव्र दुष्काळ किंवा‎ टंचाईसदृश्य परिस्थिती होवून त्याचा परिणाम‎ कृषी उत्पादन व उत्पादकतेवर मोठ्या प्रमाणात‎ होवून कृषी विकासाचा दर लक्षणीयरित्या‎ घटत आहे. घटत्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांनी‎ तणावग्रस्तता वाढत असून काही शेतकऱ्यांनी‎ आत्महत्येच्या टोकाचे पाऊल देखील उचलले‎ आहे. अशाप्रकारचे टोकाचे पाऊल‎ उचलण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये‎ यासाठी हा प्रकल्प संबंधित गावांसाठी‎ संजीवनी देणारा ठरत आहे.‎ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या‎ जिल्ह्यातील १४९ गावाच्या १२ हजार ४७८‎ शेतकरी लाभार्थींना ३२ कोटी ९० लक्ष ७६‎ हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात‎ आले.

सर्वाधिक ५८९९ शेतकऱ्यांना तुषार‎ संचाचा तर १३७७ शेतकऱ्यांना फळबाग‎ योजनेचा लाभ देण्यात आला.‎ वृक्ष लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या‎ ३४ असून मधुमक्षिका पालन करणारे २०,‎ परसातील कुक्कुटपालन करणारे २, बांबू‎ लागवड करणारे ३, सामुदायिक शेततळे‎ ६,व्यक्तिगत शेततळे ६, विहिरीचा लाभ‎ १११,ठिबक संचाचा लाभ १०६१,शेततळे‎ अस्तरीकरण ४, शेतीशाळा होस्ट फार्मर‎ ४४४,कृषी यांत्रिकीकरण १०७,नाडेप १,पाईप‎ ६७८, फळबाग १३७७, पॉली हाऊस १,‎ बीजोत्पादन १८०२, बीबीएफ तंत्रज्ञान प्रोत्साहन‎ ५२, विहीर पुनर्भरण ७२ रेशीम उद्योग ३,‎ शेडनेट हाऊस १३, शेळीपालन ३१, तुषार संच‎ ५८९९ आणि पंप संचाचा ७५१ अशा एकूण १२‎ हजार ४७८ शेतकरी लाभार्थींना आतापर्यंत‎ पोकरा प्रकल्पांतर्गत लाभ देण्यात आला आहे.‎ पोकरा प्रकल्पात येणाऱ्या या गावातील‎ शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ‎ देऊन त्यांच्या कृषी उत्पादन व उत्पादकतेत‎ वाढ करून त्यांची आर्थिक स्थिती भक्कम‎ करण्यासोबतच त्यांचे जीवनमान‎ उंचावण्यासाठी पोकरा प्रकल्पाचा हातभार‎ लागत आहे.‎