आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार:72 ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी 1356 उमेदवार उतरले रिंगणात

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ७२ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामांकन दाखल करण्याची मुदत गुरूवारी संपुष्टात आली. शेवटच्या दिवसांपर्यंत १३५६ उमेदवारांनी नामांकन अर्ज कायम ठेवले आहेत. यात सर्वाधिक २५ ग्रामपंचायतीची निवडणूक असलेल्या केळापूर तालुक्यात ५२४ अर्ज दाखल झाले आहे. तर ७२ सरपंच निवडीसाठी ३३१ अर्ज दाखल झाले आहे.

जानेवारी २०२१ ते मे २०२२ आणि जून ते सप्टेंबर २०२२ ह्या कालावधीत जिल्ह्यातील ७२ ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात येणार आहे. जिल्ह्यातील ७२ ग्रामपंचायतीची निवडणूक १८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात झाली. ऑनलाईन नामांकन अर्ज दाखल करताना उमेदवारांमध्ये सुरुवातीला निरुत्साह दिसला. तर शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या संख्येने नामांकन अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवसांपर्यंत ७२ ग्रामपंचायतीसाठी १३५६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात यवतमाळ ५६, बाभूळगाव १८, कळंब ३०, आर्णी ७४, महागाव २७, घाटंजी ११४, केळापूर ५२४, मारेगाव १९४, झरी जामणी १६२, राळेगाव १५६, असे मिळून एक हजार ३५६ उमेदवार निवडणूक रिंगणात भाग्य आजमाविणार आहेत.

मंगळवार, दि. ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता चिन्ह वाटप होणार आहे. तद्नंतर रविवार, दि. १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. सोमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असून, गुरूवार दि. २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निकालाची अधिसूचना प्रसिद्ध केल्या जाणार आहे.

थेट ७२ सरपंचाकरीता ३३१ उमेदवार
आता ग्रामपंचायत सरपंचाची निवड थेट मतदारांमधून होणार आहे. त्या अनुषंगाने नामांकन दाखल करण्यात आले. एकूण ७२ जागेकरिता ३३१ अर्ज आहेत. यात यवतमाळ १३, बाभूळगाव २, कळंब ६, आर्णी २४, महागाव १५, घाटंजी १९, केळापूर १२८, मारेगाव ५१, झरी जामणी ३२, राळेगाव ४१ उमेदवारांचा सहभाग आहे.

बातम्या आणखी आहेत...