आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:घाटंजी तालुक्यातील 141 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टी घाटंजी तालुक्याच्या वतीने पक्ष प्रवेश सोहळा स्थानिक सोनू मंगलम् घाटंजी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुरली, खापरी, करमना, कोंडजई येथील वेगवेगळया पक्ष पार्टीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसह व्ही. सी. ग्रूपचे युवा तरुण, महिला शक्ती व ज्येष्ठांना सोबत घेऊन विजय चव्हाण यांनी १४१ लोकांसह भाजप व्हीजेएनटी आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितीन भुतडा, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भाजपा ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पारवेकर, जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार व दत्ताजी राहणे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आकाश धुरट, भाजपा ज्येष्ठ नेते मधुसूदन चोपडे, सुरेश डहाके, व्हिजेएटी मोर्चा जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, शहराध्यक्ष श्री राम खांडरे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख अभिजीत झाडे, माजी तालुकाध्यक्ष गुड्डू शुक्ला, बंडू कदम, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष राकेश मिश्रा, आर्णी विधानसभा प्रमुख स्वप्निल मंगळे, माजी शहराध्यक्ष नामपेल्लीवार, भाजयुमो शहराध्यक्ष भावेश सुचक, सरचिटणीस मनोज हामंद, सोशल मीडिया विधानसभा संयोजक गोपाल काळे, अशोक राठोड, तुलसीदास आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. मुरली येथील विजय चव्हाण, सुमित गेजीक,आकाश लोखंडे,महेश भेदूरकर, विशाल कांबळे, खापरी येथील सोनू गेडाम,सचिन गाठले,ओम पारटकर, अभिषेक कुंभारे, अनुप हेमके, बंटी कोडापे, विजय गिनगूले,किरण जगताप, रामदास मांडवकर, करमनाचे विजय चव्हाण आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...