आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:जिल्ह्यातील 15 ग्रा. पं. मधील 17 जागांसाठी आज पोटनिवडणूक ; कुठे नामांकनच नाही

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतीतील ११४ प्रभागात १२८ जागा रिक्त होत्या. या करीता १३ मे रोजी पासून नामांकन दाखल झाले होते. तर रविवार, दि. ५ जून रोजी मतदान होणार होते. मात्र, काही जागा बिनविरोध झाल्या, तर काही जागांसाठी नामांकन अर्जच दाखल झाले नव्हते. अशा परिस्थितीत दहा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीतील १७ जागांसाठी रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता पर्यंत मतदान होणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. अशात गतवर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीनंतरही जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतीच्या ११४ प्रभागामधील १२८ जागा रिक्त होत्या. रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याच्या दृष्टीने दि. ५ मे रोजी तहसील स्तरावर नोटीस प्रसिद्ध झाली होती. तर दि. १३ मे रोजी पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात झाली होती. तद्नंतर मोठ्या संख्येने उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. यातील बहुतांश जागांकरिता नामांकन दाखल झालेच नाही. तर काही जागा रिक्त होत्या. उर्वरीत १७ जागांसाठी रविवार, दि. ५ जून रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता पर्यंत मतदान होणार आहे. सोमवार, दि. ६ जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण रिक्त असलेल्या १२८ जागांमध्ये बाभूळगाव १०, यवतमाळ १२, नेर ३, उमरखेड एक, महागाव एक, दिग्रस ४, घाटंजी ९, आर्णी ६, दारव्हा ११, पुसद १८, वणी १७, कळंब ४, राळेगाव ११, केळापूर ११, झरीजामणी १०, आदींचा समावेश आहे. जिल्हयातील सारफळी, खरडगांव, पाळोदी, पांढुर्णा, भांबराजा, आष्टा, कळसा, इंझाळा, मोहदरी, चिंचोली, सोनेगाव, कळमना खु.; उमरी बोरगडी, वरूड ग्रामपंचायतीचा समावेश आहे. उमेदवारांनी मोठ्या धूमधडाक्यात प्रचारात कंबर कसली होती. आता मतमोजणीच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल.

निवडणूक क्षेत्रात तीन दिवस मद्य विक्री बंद जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक क्षेत्रात सलग तीन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. यात मतदानाच्या अगोदरच्या दिवशी शनिवार, दि. ४ जून, मतदानाच्या दिवशी रविवार, दि. ५ जून आणि मतमोजणी निमित्त सोमवार, दि. ६ जून रोजी अंतिम निर्णय घोषीत होईपर्यंत मद्य विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या बंद राहणार आहे. ग्रामपंचात क्षेत्रात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता सर्व मद्य विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले.

बातम्या आणखी आहेत...