आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात गेल्या बारा वर्षात तब्बल तेरा लाख सिकलसेल तपासण्या करण्यात आल्या आहेत. यात २७ हजार ९८१ वाहक, तर एक हजार ५२४ सीकलसेल ग्रस्त रूग्ण आढळून आले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. अशात जिल्ह्यात ११ ते १७ डिसेंबर ह्या कालावधीत सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात तपासण्या करण्यात येणार आहे.
सिकलसेल आजार अनुवांशीक आहे. या आजाराचा संपूर्णपणे उपचार नाही, परंतू नियंत्रण शक्य आहे. त्यामुळे प्रशासनाकडून ह्यासाठी विशेष प्रयत्न केल्या जात आहे. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाणे कमी होणे, हातापायावर सूज येणे, भूक मंदावणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, लवकरच थकवा येणे, चेहरा निस्तेज होणे आदी सिकलसेल आजाराची लक्षणे आहेत. अशात जिल्ह्यात सन २०१० पासून सिकलसेल तपासण्यांना वेग आला आहे. मागिल दहा बारा वर्षांत जिल्ह्यात बारा लाख ९९ हजार २९ तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यात २७ हजार ९८१ वाहक असून, एक हजार ५२४ सिकलसेलग्रस्त रूग्ण आढळून आले आहे.
सर्व रूग्णांना मोफत औषधोपचार, रक्त पुरवठा, समुपदेशन करण्यात येते. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेंतर्गत आठशे ते एक हजार रूपये महिन्याचा लाभ शासनाकडून देण्यात येत आहे. अशात सिकलसेल आजार नियंत्रणा आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ११ ते १७ डिसेंबर ह्या कालाधीत सप्ताहाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात मोफत तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमा विषयी मार्गदर्शनसुद्धा केल्या जाणार आहे. सिकलसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण यांनी केले आहे.
ह्या प्रतिबंधात्मक उपाय योजना आवश्यक
यात प्रामुख्याने विवाह्यपूर्वी सिकलसेल तपासणी करूनच विवाह करावा, लाल (एसएस) आणि पिवळे (एसएस) कार्ड असलेल्यांनी आपआपसात विवाह टाळावा, सिकलसेलग्रस्त व वाहक रूग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह करावा, सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारनेनंतर आठ आठवड्याच्या आत गर्भजल तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.