आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना, नोकरी:कोरोना अन् सत्तांतरामुळे 180 पात्र उमेदवार नोकरीपासून वंचित

यवतमाळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य परिवहन महामंडळाची अजब तऱ्हा आहे. पाच महिने संपामुळे एसटीची चाके थांबली होती. एसटीला रस्त्यावर आणण्यासाठी कंत्राटी चालक, वाहकांची सेवा घेण्यात आली. परंतु, २०१९ मध्ये झालेल्या भरतीत जिल्ह्यातील १८० उमेदवार चालक, वाहक सर्वच निकषांवर पात्र ठरले. मात्र त्यांना अद्याप नियुक्तीपत्रे देत सेवेत सामावून घेण्यात आले नाही. तीन वर्षे झाली तरी एसटी महामंडळाने या पात्र उमेदवारांकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी त्यांना आर्थिक व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपण पात्र ठरलो त्यामुळे लगेच नियुक्तीही होणार, अशी आशा बाळगणारे हे १८० उमेदवार सध्या त्रस्त असून, महा मंडळाविरोधात रोष व्यक्त करीत आहेत.

हाताला काम नाही. त्यामुळे काहींचे लग्न खोळंबले आहे. काहींच्या खांद्यावर घर खर्चासह आई-वडील, लहान भावंडांची जबाबदारी आहे. वारंवार निवेदने देण्यात आली तरी पदरात निराशे शिवाय काहीच आले नाही. आता कोणाकडे दाद मागावी, अशा पेचात हे पात्र उमेदवार अडकले आहेत. कधीतरी आपल्याला नियुक्ती मिळेल या आशेवरच गेल्या तीन वर्षांपासून त्यांचा जगण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे.

मात्र एसटी महामंडळाकडून सेवेत सामावून घेण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने उमेदवार हताश झाले आहेत. यवतमाळ विभागासह राज्यातील सर्व उमेदवारांनी नियुक्ती मिळवण्यासाठी लढा उभारला असून, विभागीय कार्यालयांसह मुंबई मुख्यालयाच्या पायऱ्या झिजवून ही त्याना ठोस आश्वासन अद्याप मिळाले नाही. एसटी महामंडळाने २०१९ मध्ये चालक तथा वाहक यवतमाळ या पदासाठी घेतलेल्या सरळ सेवा भरतीत हे उमेदवार पात्र ठरले. लेखी परीक्षेनंतर पुणे येथे वाहन चालक चाचणी, वाहकाचे प्रशिक्षण झाले. कागदपत्रांच्या पडताळणीसह वैद्यकीय चाचणी, अशा भरतीच्या सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर १८० उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरले. मात्र तरीही महामंडळाच्या उदासीनतेमुळे नोकरीपासून वंचित आहेत.

वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारास खासगी व्यावसायिकांद्वारे सुरू झाली. त१९४७ मध्ये भारताच्या ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन.बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली

२०१९ च्या पद भरतीची स्थिती, ४५०० उमेदवार पात्र
राज्यातून ८०२२ पैकी ४५०० उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरले. ४५०० पैकी १८०० उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात आले. अजूनही राज्यातील २७०० उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत, यवतमाळ जिल्ह्यातील १८० उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

जगण्यासाठी संघर्ष सुरू, आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे
घरची परिस्थिती बेताची असल्याने जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. महामंडळाने अद्याप नियुक्ती दिली नाही. मात्र, आता कंत्राटी पद्धतीने चालक, वाहक भरती केली जात आहे. त्याविरोधात आमचा लढा सुरू आहे. नव्या राज्य सरकारने आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. शैलेश किन्हीकर, पात्र उमेदवार

बातम्या आणखी आहेत...