आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाची हत्या:नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खुनांच्या २ घटना; पत्नी आणि सावत्र मुलाची हत्या

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात खुनांचे सत्र संपता संपेना. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन खुनांच्या घटनांनी जिल्हा हादरला. पहिल्या घटनेत यवतमाळातील वाघापूर परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची, तर दुसऱ्या घटनेत बाभुळगाव तालुक्यातील दाभा येथे सावत्र बापाने मुलाची हत्या केली. वैशाली उत्तम गाडेकर वय ३५ वर्ष रा. वाघापूर टेकडी असे मृत विवाहित महिलेचे नाव तर दुसऱ्या घटनेतील मृत मुलाचे नाव राहुल शंकर अंजीकर (७) असे आहे.

गेल्या काही महिन्यांच्या काळात जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिस दलाच्या उपाय योजना नंतरही गुन्ह्यांच्या घटनांवर अंकुश लावल्या जात नाही. त्यामुळेच गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीतच घडलेल्या खुनांच्या तब्बल ७४ घटनांवरून पोलिसांवर चक्क गुन्हेगार शिरजोर ठरल्याची साक्ष देत आहे. सातत्याने घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.

क्षुल्लक कारणावरून थेट खुनाच्या घटना
वर्षभरात घडलेल्या गुन्ह्यांच्या घटनांचे निरिक्षण केले असता, क्षुल्लक कारणावरून एखाद्याचा चक्क खून करण्यापर्यंत गुन्हेगारांची हिम्मत वाढल्याचे दिसत आहे. घरगुती वादापासुन तर दारुसाठी पैसे न देण्याच्या शुल्लक कारणावरूनही थेट खून केल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातील गुन्हेगारी पोलिसांच्याही नियंत्रणाबाहेर तर गेली नाही ना? असा प्रश्न आता नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहे

बातम्या आणखी आहेत...