आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सॅनिटायझर पाजल्याचे प्रकरण:2 वैद्यकीय अधिकारी निलंबित, चौकशीनंतर जिल्हा परिषदेने केली कारवाई

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसी येथे पोलिओ म्हणून सॅनिटायझर पाजल्या प्रकरणात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना गुरुवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी निलंबित करण्यात आले. डॉ. भूषण मसराम, डॉ. महेश मनवर असे निलंबित वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत.

कापसी येथे १२ बालकांना पोलिओ म्हणून सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणात सीएचओ डॉ. अमोल गावंडे, आशा संगीता मसराम, सविता पुसनाके यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. अशातच राष्ट्रीय बालहक्क आयोगाने जिल्हा प्रशासनाला नोटीस पाठवली होती. त्यावरून प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत पार पडली. त्यावरून आज भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मनवर, डॉ. भूषण मसराम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल राष्ट्रीय बालहक्क आयोगाला पाठवण्यात येणार असून यात आणखी काय घडणार याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...