आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईओंची भेटी:2 हजार 124 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

यवतमाळ4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासणीच्या दृष्टीने ९४ शाळांमध्ये मंगळवार, दि. २२ नोव्हेंबरला परीक्षा पार पडली. शांततेत पार पडलेल्या परीक्षेत तिसऱ्या वर्गाचे घेण्यात येणार आहे. तिसऱ्या वर्गातील एक हजार ५८, तर पाचव्या वर्गातील एक हजार ६६, असे मिळून दोन हजार १२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.

केंद्र सरकारने सन २०१७ मध्ये देशातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण (नॅशनल अचिव्हमेंट सर्वे) घेतला होता. या परीक्षेत जिल्ह्याला कमी गुण मिळाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान समितीने शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. राज्य शासनाने ऑक्टोबर २०२१ ला ‘निपुण भारत’ कार्यक्रम राबवण्याचे निर्देश दिले.

तर मार्च २०२२ पासून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) मार्फत मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण अंतर्गत २२ नोव्हेंबरला जिल्ह्यातील ९४ शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आली आहे. यात इयत्ता तिसरीचे एक हजार ५८ आणि पाचवीचे एक हजार ६६, असे मिळून दोन हजार १२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सेंट अलायन्सेस स्कूलमध्ये प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.

परीक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी होती
यापूर्वी घेतलेल्या परिक्षेत जिल्ह्याला कमी गुण मिळाले होते. आता मागिल वर्षभरापासून विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. परीक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी केली होती. दरम्यान, तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षासुद्धा घेतली. परिक्षा अत्यंत शांततेत पार पडली असून ओएमआर शीट वरिष्ठ स्तरावर तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...