आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन:महागावसाठी 20 कोटींचा निधी द्या

महागाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाव शहरातील विकास कामे करण्यास २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नगर पंचायतचे शिवसेना गटनेते रामराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.महागाव शहरात नव्याने नगर पंचायत स्थापना होवुन जवळपास सात वर्षांचा कार्यकाळ लोटला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने शहरात अनेक विकास कामे प्रलंबित आहेत.

महागाव शहराचा संपुर्ण सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रस्ता विकास अनुदान योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती महा नगरोत्थान योजने अंतर्गत शहरातील रस्ते, हिंदु स्मशानभूमी परिसरात विकास कामे, मुस्लिम कब्रस्तान परिसरात विविध विकास कामे, त्याच प्रमाणे शहरात अनेक विकास कामे करावयाची असुन याकरिता २० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महागाव नगर पंचायतचे शिवसेना पक्षाचे गटनेते रामराव पाटील नरवाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महागाव शहराचा कायापालट करण्यासाठी नगर पंचायतचे गटनेते रामराव पाटील यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी व नगरसेवक कार्य करीत आहे. विविध विकास कामे करवुन घेतली आहेत.

बातम्या आणखी आहेत...