आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वस्तात सोने मिळत असल्याचे आमिष एका सुवर्णकारासह त्याच्या नातलगाला चांगलेच महागात पडले आहे. सोनेरी टोळीने विश्वास संपादन करून दोघांनाही बेदम मारहाण करून त्यांच्याकडील २० लाखांची रोकड घेवून पोबारा केल्याची घटना महागाव तालुक्यातील मुडाणा येथे दि. १३ डिसेंबर ला दुपारी घडली आहे. आर्णी येथील सुवर्णकार सुरेंद्र गावंडे व त्यांचे नातलग बंडू राऊत रा.रुई वाई अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सुरेंद्र गावंडे यांनी दि. १६ डिसेंबरला दिलेल्या तक्रारीवरून महागाव पोलिस ठाण्यात अज्ञात ९ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आर्णी येथील प्रतिष्ठित सुवर्णकार यांचे “गावंडे सुवर्णकार “ नावाने सोने चांदीचे दागिने बनविण्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात बंडू राऊत यांचे मेहुणे गणेश भलके दुकानात आले. मित्राकडे सोन्याचे नाणी असून ते खरे आहेत की खोटे हे बघायला जायचे आहे.त्यासाठी तुमचा वेळ पाहिजे असल्याचे सांगितले. बाजाराचा दिवस असल्याने उद्या या असे सांगितले.त्यानुसार बंडू राऊत व गणेश भलके हे दुसऱ्या दिवशी सदर सुवर्णकाराला घेण्यासाठी त्यांच्या दुकानात आले . सुरेंद्र गावंडे यांनी सोने तपासणीचे साहित्य घेवून त्यांच्या गाडीत बसून महागावला आले.
बस स्थानक परिसरात दोन अज्ञात व्यक्ती थैली घेवून उभे होते. दोन सोन्याची नाणी त्यांनी दाखविले. त्याची तपासणी केली असता सोन्याची नाणी खरी निघाली. सुवर्णकार यांनी त्यावर तेजाब साहाय्याने तपासणी करावयाची आहे. त्यावेळी येथे गर्दी असल्याने उर्वरित सोन्याची तपासणी करण्यासाठी सोनेरी टोळीच्या दोन्ही सदस्यांनी महागाव शहराच्या टोकावर असलेल्या विराट हनुमान मंदिराकडे आपला मोर्चा वळवला.तेथे दोन्ही सोन्याचे नाणी पुन्हा तेजाबने तपासणी केली. सोन्याचे नाणी खरे असल्याचा सुरेंद्र गावंडे यांनी केलेल्या पडताळणी समोर आले.
नाणी संदर्भात खात्री पटल्याने सोनेरी टोळक्यांच्या दोन्ही सदस्यांनी सुरेंद्र गावंडे सुवर्णकार यांना विश्वासात घेतले.असे आमच्या थैलीत तब्बल दीड किलो सोन्याची नाणी असल्याचे सांगितले.आपण किती घ्याल असे अज्ञातांनी तगादा लावला.त्यावेळी सुरेंद्र गावंडे आणि त्यांचे नातलग बंडू राऊत या दोघांनी हे सोन्याचे नाणी घेण्याचे ठरविले.लगेच त्यांनी बनावटी दीड किलो नाणीचा अवघ्या २० लाखात सौदा केला.मात्र सोबत पैसे नसल्याने दि. १६ डिसेंबरला पैसे देण्याचे ठरले.सुरेंद्र गावंडे यांनी स्वतःचे व नातलगाचे सोने बँकेकडे सोने गहाण ठेवून १० लाख रुपयांची व स्वतः कडील नगदी असलेले ५ लाख असे १५ लाखांची तडजोड केली. त्यामध्ये उर्वरित रक्कम टाकण्याचे सांगून रोकड असलेल्या बॅग बंडू राऊत यांना दिली.
पैश्याची तोडा जोड झाल्याने त्यांनी ठरलेल्या नुसार मुडाणा शिवार गाठले. त्यांना घेण्यासाठी या टोळीतील सदस्य आला. मुडाणा परिसरात असलेल्या जंगलात त्यांना घेवून गेला. रोकड असल्याची खात्री या टोळीतील सदस्याने केली.तेव्हा तेथे दबा धरून बसलेल्या सोनेरी टोळीतील ६ ते ७ जणांच्या टोळक्यांनी बंडू राऊत यांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली .तर सुवर्णकारावर दगड भिरकावले.जीव वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेत महामार्गावर पोहचले.दरम्यानरोकड असलेल्या बॅग घेवून सोनेरी टोळीने पोबारा केला. घटनेची वाच्यता होऊन बदनामी होणार यासाठी फसवणूक झालेल्या सुवर्णकाराने तक्रार देण्याचे टाळले. मात्र यावर विचार विनिमय करून सदर सुवर्णकार यांनी आर्णी आणि महागाव येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांना घटनेची माहिती गावंडे यांनी दिली. त्यानुसार सुवर्णकार सुरेंद्र गावंडे यांनी महागाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.