आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कि.मी. सायकलस्वारी:वीस वर्षीय युवकाची 22 हजार कि.मी. सायकलस्वारी

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृक्ष लागवड करावी, सेव्ह सॉईल आणि प्लास्टिक मुक्त नदीचा संदेश घेऊन बनारस येथील २० वर्षीय प्रदीप कुमार याने सायकलस्वारी चालू केली आहे. आतापर्यंत बांग्लादेश, नेपाळ येथे फिरून आलेल्या प्रदीपने काही दिवसांपूर्वीच देशात एंट्री केली आहे. अशात शनिवार, दि. २७ ऑगस्ट रोजी प्रदीप कुमार हे वणी येथून यवतमाळात दाखल झाले. येथील माधव मनोज औदार्य यांच्या घरी मुक्काम करून रविवार, २८ ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाला आहे.

देशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिकने व्यापलेल्या नद्यांमुळे प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त नद्या करणे, वृक्षतोड थांबवणे तसेच माती संरक्षणाचा संदेश घेऊन उत्तर प्रदेशातील बनारस येथील २० वर्षीय प्रदीप कुमार याने दि. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी पासून सायकल स्वारी चालू केली आहे. आतापर्यंत तब्बल २२ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.

विशेष म्हणजे बांग्लादेश, नेपाळ ह्या दोन्ही देशात सायकलने प्रदीप कुमार फिरून आला आहे. काही दिवसांपूर्वीच देशात आलेल्या प्रदीप कुमार यांचे वणी येथे नुकतेच आगमन झाले. दरम्यान, शनिवार, २७ रोजी रात्रीच्या सुमारास यवतमाळ येथे त्याचे आगमन झाले. तो माधव मनोज औदार्य यांच्या घरी मुक्कामी होता. रविवारी, २८ रोजी जालना जिल्ह्याच्या दिशेने प्रदीप निघाले आहे. जालना येथून मुंबई, गुजरात, जम्मु काश्मिर, लेह-लद्दाख आणि संपूर्ण भारत फिरणार आहे. शेवटी लंडन येथे जाण्याची ईच्छा सुद्धा प्रदीप कुमारने व्यक्त केली.

एक लाख झाडांच्या लागवडीचे उद्दिष्ट
सायकलस्वारी करणाऱ्या प्रदीप कुमार यांनी एक लाख वृक्ष लागवड करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यापूर्वीच एक हजार ६२० वृक्ष लागवड केली आहे. संपूर्ण भारतात फिरून वृक्ष लागवड करण्याबाबतचा संदेश प्रदीप कुमार यांच्या माध्यमातून दिल्या जात आहे. यासाठी त्यांनी विविध सोशल मीडियाचा आधार घेतला असून, त्या माध्यमातूनही संदेश दिल्या जात आहे.

बातम्या आणखी आहेत...