आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार नोंद:फळ विक्रेत्याच्या 22‎ वर्षीय मुलाची हत्या‎

यवतमाळ‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका फळ विक्रेत्याच्या २२ वर्षीय‎ मुलाची निर्घृण हत्या करीत त्याचा‎ मृतदेह विहिरीत फेकण्यात आला.‎ ही धक्कादायक घटना शहरातील‎ पिंपळगाव परिसरात शनिवार, दि. ११‎ मार्चला सकाळी उघडकीस आली‎ असून या घटनेने शहरात एकच‎ खळबळ उडाली आहे. रोशन‎ देविदास बिनझाडे वय २२ वर्ष रा.‎ रविदास नगर, माच्छी पूलजवळ,‎ यवतमाळ असे मृत मुलाचे नाव‎ आहे.‎ या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून‎ मिळालेल्या माहितीनूसार,‎ शहरातील रविदास नगर परिसरातील‎ माच्छी पुलाजवळ फळ विक्रेते‎ देविदास बिनझाडे कुटुंबीयांसह‎ वास्तव्यास आहे.‎ धूलिवंदनाच्या दिवशी दि. ८ मार्चला‎ त्यांचा मुलगा रोशन हा घराबाहेर‎ गेला होता. मात्र बराच वेळ होवून तो‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घरी परतला नाही. त्यामूळे‎ कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधमोहीम‎ राबविली. मात्र तो कुठेच आढळून‎ आला नाही. अखेर दि. १० मार्चला‎ कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात‎ मिसिंगची तक्रार नोंद केली.

एक संशयित ताब्यात‎ तर दुसरा कारागृहात‎ रोशन बिनझाडे याची जुन्या वादातून‎ हत्या करण्यात आल्याचा संशय‎ पोलिसांकडून वर्तवण्यात आला‎ आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका‎ संशयितांना ताब्यात घेतले असून‎ दुसरा संशयिताला दि. ८ मार्चला‎ पोलिसांनी एका वॉरंटमध्ये ताब्यात‎ घेवून त्याची कारागृहात रवानगी‎ केल्याचे सांगण्यात येत आहे.‎ संशयितांच्या पोलिस चौकशीनंतर‎ या हत्येचे गुढ समोर येणार आहे.‎ पुढील तपास शहर पोलिस करीत‎ आहे.‎

एक संशयित ताब्यात‎ तर दुसरा कारागृहात‎
रोशन बिनझाडे याची जुन्या वादातून‎ हत्या करण्यात आल्याचा संशय‎ पोलिसांकडून वर्तवण्यात आला‎ आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका‎ संशयितांना ताब्यात घेतले असून‎ दुसरा संशयिताला दि. ८ मार्चला‎ पोलिसांनी एका वॉरंटमध्ये ताब्यात‎ घेवून त्याची कारागृहात रवानगी‎ केल्याचे सांगण्यात येत आहे.‎ संशयितांच्या पोलिस चौकशीनंतर‎ या हत्येचे गुढ समोर येणार आहे.‎ पुढील तपास शहर पोलिस करीत‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...