आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्या वादातून २२ वर्षीय रोशन बिनझाडे या युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह पिंपळगाव मार्गावरील विहिरीत फेकला होता. ही घटना ११ मार्चला सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इरफान अली बरकत अली उर्फ इरफान लेंडी वय ४५ रा. आंबेडकर नगर, यवतमाळ, अखिल उर्फ गोलू आरिफ सय्यद आणि शेख जमील शेख जलील रा. यवतमाळ अशी त्या मारेकऱ्या तीन जणांची नावे आहेत.
या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, शहरातील रविदास नगर येथील रोशन बिनझोड या २२ वर्षीय युवकाचा काही दिवसांपूर्वी इन्नू उर्फ इनायत अली, मोहम्मद गोलू उर्फ सय्यद आसिफ, इरफान अली उर्फ इरफान लेंडी आणि सोहेल शराफत अली यांच्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर ८ मार्चला त्याला पाचधारा परिसरात जेवन करण्यासाठी बोलावले होते. त्या ठिकाणी पुन्हा रोशनसोबत वाद झाला.
दरम्यान धारदार शस्त्राने वार करत रोशनची हत्या करण्यात आली. त्यानंतररोशनचा मृतदेहपिंपळगावमार्गावरील एकाविहिरीत फेकलाहोता. दरम्यानकुटुंबीयांनी सर्वत्रशोध मोहीमराबवली, मात्र रोशन कुठेच आढळून आला नव्हता. अखेर १० मार्चला शहर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. दरम्यान दुसऱ्या दिवशी ११ मार्चला पिंपळगाव परिसरातील विहिरीत रोशनचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यामुळे घडलेला संपूर्ण घटनाक्रमच समोर आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यामध्ये मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी शहर पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह इरफान अली बरकत अली उर्फ इरफान लेंडी, अखिल उर्फ गोलू आरिफ सय्यद आणि शेख जमील शेख जलील या तिघांना ताब्यात घेतले. रविवारी त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनात शहर ठाणेदार नंदकिशोर पंत, सहायक पोलिस निरीक्षक सचिन लुले पाटील करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.