आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुसद तालुक्यातील घटना:24 तास उलटूनही मारेकरी सापडेना; 19 वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरून आमदरीच्या घाटात खून

पुसद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरून अज्ञात मारेकऱ्याने त्याची हत्या केली. ही घटना पुसद तालुक्यातील आमदरी घाटातील जंगलात सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेला आता २४ तासाचा कालावधी लोटला मात्र अद्यापही त्या विद्यार्थ्याच्या खुनातील मारेकऱ्याचा क्ल्यु पोलिसांना सापडला नाही. त्यामूळे या खुनातील मारेकऱ्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर येवून ठेपले आहे. गजानन बंडू ढोले वय १९ वर्ष रा. मांडवा असे त्या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पुसद तालुक्यातील मांडवा येथील गजानन ढोले हा त्याच्या मामाच्या घरी नांदेड जिल्ह्यातील ईरापुर येथे रविवारी गेला होता. त्यानंतर तो त्याच दिवशी दुपारी तेथून घरी येण्यासाठी निघाला होता. मात्र उशिरापर्यंत तो घरी पोहचला नाही. त्यामूळे कुटुंबीयांना त्याची काळजी वाटू लागली. दरम्यान त्यांनी मामाकडे गजानन याची चौकशी केली. मात्र तो दुपारीच निघून गेल्याचे कळाले. दरम्यान कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी आमदरी घाटातील जंगलालगत त्याची दुचाकी कुटुंबीयांना आढळली. मात्र त्याचा काही शोध लागला नाही. अखेर कुटूंबीय दुचाकी घेवून गावाकडे परतले. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी कुटूंबीयांसह गावकऱ्यांनी त्याची शोधमोहीम राबवली असता, त्याचा मृतदेह धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...