आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वपरीक्षा:2542 उमेदवारांनी दिली लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यसेवा (पूर्व) परीक्षा रविवारी जिल्ह्यातील १७ उपकेंद्रांवर सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत दोन सत्रात पार पडली. या परीक्षेकरीता जिल्ह्यातील एकूण ३ हजार ३२७ परीक्षार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये २ हजार ५४२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली तर ७८५ परीक्षार्थी मात्र गैरहजर असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोन वर्षे लागू असलेल्या निर्बंधांमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. सर्वच ठिकाणचे युवक-युवती रोजगाराच्या शोधात असून, विविध स्तरांवर रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान आता शासनानेही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेऊन विविध पदांवर नियुक्ती करण्याची प्रक्रिया गतीमान केली आहे. त्याअनुषंगाने रविवारी यवतमाळ शहरातील १७ केंद्रावर ही परीक्षा पार पडली. एकूण ३ हजार ३२७७ पैकी २ हजार ५४२ उमेदवारांनी परिक्षा दिली. तर ७८५ उमेदवार गैरहजर होते. परीक्षेच्या दृष्टीने उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी-५, भरारी पथक प्रमुख-१, वर्ग १, विशेष निरीक्षक १ तसेच एकूण ३२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. रविवारी परिक्षा असल्याने दिवसभर केंद्राबाहेर उमेदवारांची गर्दी दिसुन आली. यावेळी परिक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षेच्या कालावधीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून यासाठी पोलिस कर्मचारी सतर्क होते. काही परीक्षा केंद्राबाहेर उमेदवारांसह येणाऱ्या-जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी जमली होती.

बातम्या आणखी आहेत...