आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराळेगाव तालुक्यातील प्रा. आ. केद्र वरध उपकेंद्र पळसकुड येथे ७५ वा आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात विविध आजार असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. परिसरातील रुग्णांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
मोतीबिंदू, दमा, रक्तदाब, मधुमेह आणि लहान बाळांचे आजार या रुग्णांवर शिबिरात उपचार करण्यात आले. २६० रुग्णांना याचा लाभ झाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोपाळ पाटील यांचे मार्गदर्शनात डॉ. प्रतीक वाघमोडे यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन पार पडले. यावेळी डॉ. सूरज मोरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अहतेशाम खान, डॉ. उमेश निचत, पोलिस पाटील मधुकर तोडसाम, आरोग्य सेविका प्रतिभा इरपाते, डॉ. प्रीती, डॉ. अनुज, डॉ. भूषण, डॉ. रुपाली, डॉ. पावरा, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका आशा सेविका यांच्यासह ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.वरध प्रा. प्रा. आ. केंद्रा अंतर्गत खैरगावं, लोणी, सराटी, बंदर, सावरखेड, पळसकुंड, भीमसेनपूर, सुभानहेटी, घुबडहेटी, सेंडपोड, उमरविहीर आदी गावातील रुग्णांना या शिबिराचा लाभ झाला.
विशेष म्हणजे हा संपूर्ण दुर्गम भाग आहे. येथे आरोग्याच्या सुविधा नाहीत. गोर -गरीब रुग्णांकरीता अशा स्वरूपाचे शिबीर वरदान ठरतात. ग्रामीण भागातील अनेक गरजू रुग्ण अज्ञान व गरिबीमुळे आजार अंगावर काढतात. ज्या मुळे अनेकदा रोग बळकावतो, मृत्यूच्या घटना देखील घडतात. आझादी का अमृत महोत्सव या शिबिराच्या माध्यमातून साजरा करण्याची ही संकल्पना स्तुत्य असल्याची भावना अनेकांनी या प्रसंगी व्यक्त केली. परिसरातील रुग्णांनी या शिबिराबाबत समाधान व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.