आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखू जप्त:ट्रकमधून छुप्या पध्दतीने नेत असलेला 26.5 लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रकमधून छुप्या पध्दतीने वाहतूक करण्यात येणारा साडे सव्वीस लाखाचा प्रतिबंधित तंबाखूनजन्य पदार्थ पांढरकवडा पोलिसांनी पकडला. ही कारवाई पिंपळखुटी आरटीओ चेक पास्ट परिसरातील रविवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास करण्यात आली. फकरू रती खान वय ३१ वर्ष रा. हमजापूर हरियाणा असे ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

नागपूर मार्गे अदिलाबादकडे पांढरकवडा नॅशनल हायवेने ट्रक क्रमांक एनएल-०१-एडी-५६०३ मध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली. त्यावरून मध्यरात्री १ वाजता पोलिसांनी पिपंळखुटी चेकपोस्टवर ट्रक अडवून तपासणी केली. यावेळी ट्रकमध्ये केबल, अल्युमिनीयम सामान, कॉर्टुन, टायर आदी आढळून आले. तर खालच्या बाजूला बारदाना पोते व त्यात पांढऱ्या रंगाच्या नॉयलॉन पिशव्या आढळून आल्या. त्यात २६ लाख ४० हजार रूपयाचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा माल आढळून आला. याबाबतची माहिती पांढरकवडा पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून २६ लाख ४० हजार रूपयाचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि ट्रक असा एकूण ४६ लाख ४० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप पाटील, ठाणेदार जगदिश मंडलवार, एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदिप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय महाले, हेमराज कोळी, पथकातील अशोक नैताम, राजु बेलयवार, सचिन काकडे, राजेश सुरोशे यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...